२०२३ हे वर्ष शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. कारण या वर्षी तो तीन चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांपैकी त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. तर त्या व्यतिरिक्त ‘जवान’ आणि ‘डंकी’ या दोन चित्रपटांमध्ये तो या वर्षी झळकणार आहे. त्याच्या ‘जवान’ या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

शाहरुखने ‘जवान’ची घोषणा करताच सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले. यातील त्याच्या फर्स्ट लूकचीही प्रेक्षकांनी प्रशंसा केली. गेले अनेक दिवस शाहरुख खान त्याच्या ‘जवान’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. या चित्रपटाचा टीझर कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अखेर या चित्रपटाचा टीझर शेअर करून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shiva
Video: आशू भर मंडपात शिवाबरोबरच्या घटस्फोटाचे पेपर फाडणार तर सारंग सावलीला…; मालिकांमध्ये येणार मोठा ट्विस्ट, पाहा
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?
Bigg Boss Marathi Season 5 Fame Abhijeet Sawant Reel Video With Wife And Daughters
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा पत्नी अन् मुलींबरोबर सुंदर Reel व्हिडीओ; योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर म्हणाली…
Shiva
Video: “तुझा संसार…”, दिव्याचे सत्य शिवासमोर आणण्यासाठी चंदन काय करणार? ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
south suspense thriller movies
थरारक सीन्सच्या जोडीला आहेत चकित करणारे क्लायमॅक्स, मोफत पाहता येतील ‘हे’ चित्रपट
Paaru
Video: “माझ्या रूममध्ये त्या दिवशी…”, प्रितमच्या खुलाशानंतर आदित्य अनुष्काला जाब विचारणार; ‘पारू’ मालिकेत नेमकं काय घडणार?

आणखी वाचा : Video: “‘पठाण’ हिट झाला म्हणून इतका माज…!” शाहरुख खानची ‘ती’ कृती पाहून नेटकरी नाराज

शाहरुख खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या चित्रपटाचा टीझर शेअर केला. या टीचर मध्ये शाहरुख खान त्याच्या संपूर्ण शरीरावर पट्ट्या बांधून हातात भाला घेऊन हवेत उडी मारून खाली येताना दिसत आहे. या टीझरमध्ये अटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत, तर गौरी खान ‘रेड चिली एंटरटेनमेंट’च्या मार्फत या चित्रपटाची निर्मिती करत असल्याचं लिहिलं आहे. तर या चित्रपटाच्या टीझरच्या शेवटी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची बदललेली तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार आता हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : ‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहून भारावला शाहरुख खान, चाहत्यांना सक्सेस मंत्र देत म्हणाला…

शाहरुख खानने हा टीझर शेअर करताच प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. हा टीझर नेटकऱ्यांना आवडला असून या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत अशा कमेंट्स करत नेटकरी या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत. शाहरुख खानबरोबरच या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसेल. तर या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Story img Loader