शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. सगळीकडे ‘जवान’ची जादू पाहायला मिळत आहे. शाहरूखचे चाहते सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडणारा प्रत्येकजण चित्रपटाचे कौतुक करत आहे.

अनेक गंभीर विषयांवर हा चित्रपट बनवला आहे. चित्रपटातील संवादांवर प्रेक्षक शिट्ट्या वाजवत आहेत आणि गाण्यांवर थिएटर्समध्येच थिरकत आहेत. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल अनेक अंदाज बांधले जात होते, अशातच आता आकडेवारी समोर आली आहे. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार ‘जवान’ने पहिल्या दिवशी भारतात ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये ६५ कोटी हिंदीमध्ये, तर प्रत्येक ५-५ कोटी तमिळ आणि तेलुगूमध्ये व्यवसाय केला.

Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
aamir khan appreciated ilu ilu 1998 movie and Ajinkya phalke
आमिर खानला ‘या’ नव्या मराठी चित्रपटात काम करण्याची होती इच्छा पण…; अभिनेता मराठीत संवाद साधत म्हणाला…
Chhava Movie
‘छावा’मध्ये ‘ती’ वादग्रस्त दृष्ये का घेतली? दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी संगितलं नेमकं कारण
kajol on indonesian delegants kuch kuch hota hai song
इंडोनेशियन शिष्टमंडळाला ‘कुछ कुछ होता है’ गाण्याची भुरळ, राष्ट्र्रपती भवनात सादर केले शाहरुख-काजोलचे गाणे; अभिनेत्री म्हणाली…
shahid kapoor at screen
Shahid Kapoor Live : ‘जब वी मेट’च्या गीत व आदित्यबद्दल शाहिद कपूरला काय वाटतं? पाहा मुलाखत
Chhaava Trailer Outrage Uday Samant
Chhaava Movie Trailer: “..तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत सरकारची स्पष्ट भूमिका; उदय सामंत म्हणाले…
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…

आणखी वाचा : Jawan Review: खास दाक्षिणात्य तडका, शाहरुखचा हटके अंदाज व गंभीर समस्यांवर भाष्य; ‘जवान’ खरंच पैसा वसूल आहे का?

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘जवान’ हा इतरही देशात प्रदर्शित झाला आहे, परंतु हा चित्रपट बांग्लादेशमध्ये प्रदर्शित करण्यात आला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ७ सप्टेंबर या दिवशीच ‘जवान’ बांग्लादेशमध्येही प्रदर्शित होणं अपेक्षित होतं, पण तिथल्या सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पास केला नसल्याने तो अजून तिथे प्रदर्शित झालेला नाही.

‘पठाण’ने बांग्लादेशच्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यानंतर तिथले प्रेक्षक शाहरुखच्या ‘जवान’ची आतुरतेने वाट बघत होते. शिवाय ‘जवान’ ठरलेल्या दिवशी प्रदर्शित होईल असंही सांगण्यात आलं होतं, पण तिथल्या सेन्सॉर बोर्डाने अद्याप हा चित्रपट पास केला नसल्याने प्रेक्षक संभ्रमात पडले आहेत. अद्याप यामागील कारण समोर आलं नसलं तरी काहीशा आंदोलनामुळे हे प्रदर्शन रोखण्यात आलं असल्याचं संगितलं जात आहे.

Story img Loader