२०२३ हे वर्ष शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. कारण या वर्षी तो तीन चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांपैकी त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. तर त्या व्यतिरिक्त ‘जवान’ आणि ‘डंकी’ या दोन चित्रपटांमध्ये तो या वर्षी झळकणार आहे. आता त्याच्या ‘जवान’ या चित्रपटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुखने ‘जवान’ची घोषणा करताच सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले. यातील त्याच्या फर्स्ट लूकचीही प्रेक्षकांनी प्रशंसा केली. गेले अनेक दिवस शाहरुख खान त्याच्या ‘जवान’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. अखेर आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. पण टीझर प्रदर्शित होण्याच्या काही तास आधीच या टीझरमधील एक क्लिप लिक झाली आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाच्या टीझरचा एक छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘जवान’ या चित्रपटाच्या सेटवरून अनेकदा काही फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता टीझर रिलीज होण्याच्या काही तास आधी त्याची एक क्लिप लिक झाल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओत धमाकेदार अॅक्शन दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते, हा व्हिडीओ ‘जवान’च्या टीझरचा छोटासा भाग असल्याचे, म्हणत आहेत. मात्र, या व्हिडीओत कितपत तथ्य आहे हे टीझर प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

हेही वाचा : विजय सेतुपतीचा भाव वाढला, ‘जवान’ चित्रपटासाठी आकारले ‘इतके’ कोटी मानधन

शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘जवान’ हा चित्रपट २०२३च्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासह अभिनेता विजय सेतुपतीदेखील दिसणार आहे. तर या चित्रपटात दीपिका पदुकोण कॅमिओ करताना दिसणार असल्याचंही बोललं जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan starrer jawan teaser clip gets viral on social media rnv