बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या विरोधात सध्या देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. प्रदर्शनाआधीच शाहरुखचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचं ‘बेशरम रंग’ काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं. त्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या बिकिनीवरून देशभरात राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. अशात आता शाहरुख खानचा कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
शाहरुख खानने नुकतीच कोलकाता येथे सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या आगामी प्रोजेक्टवर भाष्य केलं. सध्या ‘बॉयकॉट पठाण’ ट्रेंडमुळे चर्चेत असलेल्या शाहरुखने या वादादरम्यान असं काही व्यक्तव्य केलं आहे की त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा- Kiff 2022 : आधी पाया पडला, मग मिठी मारली अन्…; अमिताभ – शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खान म्हणतो, “काही दिवसांपासून मी इथे आलेलो नाही, तुमच्याशी संवाद साधलेला नाही. तुम्हाला भेटू शकलेलो नाही. पण आता जग सामान्य जीवन जगू लागलं आहे. आपण सर्व आनंदी आहोत आणि सर्वाधिक आनंदी मी आहे आणि हे सांगताना मला थोडाही संकोच वाटत नाही की जगाने काहीही केलं तरीही मी, तुम्ही आणि जे सकारात्मक लोक आहे ते सर्वच्या सर्व जिवंत आहेत. धन्यवाद!”
नक्की पाहा- VIDEO: “शाहरुख खानचा पठाण चित्रपटातील लूक माझ्यासारखा, कारण…”, अभिजीत बिचुकलेचा मोठा दावा
दरम्यान शाहरुख खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान त्याचे आगामी प्रोजेक्ट आणि करोना काळातील समस्यांवर बोलताना दिसत आहे. पण सध्या ‘पठाण’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे वक्तव्य फारच सुचक असल्याचं बोललं जात आहे. अनेकांनी शाहरुखच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.