शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना यातील शाहरुख खानचे वेगवेगळे लूक्स पसंत पडले आहेत. आता या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संपूर्ण चित्रपटसृष्टीतसुद्धा याच चित्रपटाची चर्चा आहे. कलाकारदेखील या चित्रपटाबद्दल भरभरून बोलत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचच्या आधी चेन्नईमध्ये एक प्री-रिलीज इवेंट आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीलही बरीच मातब्बर मंडळी तिथे हजर होती. त्यावेळचा शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “तू फक्त अभिनयातला बादशाह नाहीस…” शाहरुख खानसाठी किरण मानेंनी केलेली खास पोस्ट चर्चेत

या इवेंटदरम्यान ‘जवान’चा दिग्दर्शक अॅटली हा त्याच्या संपूर्ण कुटुंबासह आला होता. जेव्हा अॅटली त्याच्या आईला घेऊन मंचावर आला तेव्हा त्यांना पाहून शाहरुख खान त्याच्या आईसमोर नतमस्तक झाला आणि वाकून त्याने अॅटलीच्या आईला नमस्कार केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शाहरुख हा अत्यंत साधा अन् आपल्या संस्कारांशी जोडलेला स्टार आहे असं त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे. ‘जवान’ची सध्या जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. तब्बल ५ लाख तिकीटे विकली गेली असून हा चित्रपट सगळेच रेकॉर्ड मोडीत काढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात शाहरुखसह विजय सेतुपती, नयनतारा, सुनील ग्रोव्हर, सान्या मल्होत्रा, मराठमोळी गिरिजा ओक हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan takes blessing of jawan director atlee mother viral video avn