शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. मात्र शाहरुख नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करत चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. सोशल मीडियाद्वारे शाहरुख चाहत्यांशी संवाद साधत आहे. नुकतचं त्याने ट्विटरवर ‘आस्क एसआरके’ सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले.

आणखी वाचा – तीन वर्षांमध्येच मोडला संसार, आता ४३व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याने मराठमोळ्या मुलीशी केलं दुसरं लग्न, व्हिडीओ व्हायरल

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
shah rukh khan charge how much fees to perform at delhi wedding
दिल्लीतील लग्नात डान्स करण्यासाठी शाहरुख खानने किती रुपये घेतले? नववधूच्या मेकअप आर्टिस्टने केला खुलासा
prajakta mali marathi actress reveals her weight
प्राजक्ता माळीचं वजन किती? भलंमोठं कॅप्शन लिहित केला खुलासा; म्हणाली, “लोक म्हणू लागलेत एवढी बारीक…”
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
swapnil rajshekhar tula shikvin changalach dhada
“केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

‘आस्क एसआरके’ सेशनमध्ये शाहरुख खानने चाहत्यांना त्याला प्रश्न विचारण्यास सांगितलं. यावेळी त्याच्याशी संवाद साधण्याची संधी चाहत्यांना मिळाली. एकापेक्षा एक भन्नाट प्रश्न यावेळी शाहरुखला विचारण्यात आले. यावेळी त्यानेही काही मोजक्याच प्रश्नांची मजेशीर उत्तर दिलं. त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.

दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला त्याच्या कमाईबाबतच प्रश्न विचारला. “एका महिन्यामध्ये किती कमाई करतोस?” असा प्रश्न या चाहत्याने विचारला. यावर शाहरुखने लगेचच अगदी मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला, “प्रत्येक दिवशी प्रेम खूप कमावतो.” पण किती कमाई करतो हे न सांगता शाहरुखने त्याला भन्नाट उत्तर दिलं.

आणखी वाचा – रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांतच कमावले इतके कोटी

शाहरुख चार वर्षांनी ‘पठाण’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणसह त्याची असलेली केमिस्ट्री पाहण्यासही चाहते उत्सुक आहेत. ‘पठाण’ प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Story img Loader