शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सगळीकडे याच चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटर्सबाहेर गर्दी करत आहेत. थिएटर्समध्ये प्रेक्षक जवानच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत, तर सिनेमागृहांबाहेर ते ‘जवान’ प्रदर्शित झाल्याचं जंगी सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.
कसा आहे शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत ‘जवान’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले…
शाहरुख खानच्या जवानाला चाहते भरभरून प्रेम देत आहेत. चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल शाहरुख खानने सर्वांचे आभार मानले आहेत. शाहरुखने ट्विट करत लिहिलं, “व्वा वेळ काढून प्रत्येक फॅन क्लबचे आणि चित्रपटगृहात आनंदाने गेलेल्या तुम्हा सर्वांचे आभार मानले पाहिजेत. तुमच्या प्रतिसादामुळे मी भारावून गेलो आहे. मी एक-दोन दिवसात वेळ मिळताच आवश्यक ते काम करेल. जवानवर प्रेम केल्याबद्दल लव्ह यू.”
‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत. पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक जात आहेत, अशातच शाहरुख प्रेक्षकांचे आभार मानायला विसरलेला नाही. त्याने खास ट्वीट करत त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, ‘जवान’मध्ये शाहरुख खानबरोबर नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसत आहेत. अॅटली दिग्दर्शित जवानची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. तसेच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.