आधी ‘पठाण’ अन् आता ‘जवान’ अशा दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा किंग खान शाहरुख खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. दोन्ही चित्रपटांनी १००० कोटींचा टप्पा पार केल्याने आता शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाकडून असणाऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘डंकी’च्या माध्यमातून शाहरुख खान व राजकुमार हिरानी हे प्रथमच एकत्र काम करणार आहेत.

‘डंकी’ची कथा ही आपल्या देश सोडून परदेशात स्थलांतरित झालेल्या लोकांवर बेतलेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतंच ‘डंकी’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं व प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली. तेव्हापासूनच याच्या टीझरची लोक आतुरतेने वाट बघत आहेत. शाहरुखच्या चाहत्यांनी फॅन-मेड टीझरसुद्धा सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे.

Bharti Singh
Video : शाहरुख खानचं ‘ते’ कृत्य पाहून भारती सिंगला अश्रू झाले अनावर; किस्सा सांगत म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
chhaava movie director laxman utekar meets raj thackeray
“४ वर्षांपासून आम्ही चित्रपट बनवतोय, एक सीन डिलीट करणं…,” राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’च्या दिग्दर्शकाने सांगितला निर्णय
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे सध्या तडफडत आहेत कारण… किरीट सोमय्यांनी थेट…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: पुष्पा काकीच्या ‘त्या’ कृतीमुळे तुळजासमोर सत्य येणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा
aaditya thackeray (1)
Maharashtra News : देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्याबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले, “काही गोष्टी लवकरच समोर येतील”
Kushal Badrike
“आनंदाची बातमी…”, श्रेया बुगडेबरोबरचा व्हिडीओ शेअर करीत कुशल बद्रिके म्हणाला, “आगे पूरी बारात…”

आणखी वाचा : अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’चा रामायणाशी नेमका संबंध कसा? जाणून घ्या

आता याच्या टीझरबाबतीत एक नवी माहिती समोर येत आहे. ‘पिंकव्हीला’च्या रीपोर्टनुसार ‘डंकी’चा पहिला टीझर शाहरुखच्या वाढदिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. युट्यूब आणि अन् सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा टीझर प्रदर्शित केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सलमान खानच्या ‘टायगर ३’बरोबरच चित्रपटगृहात ‘डंकी’चा पहिला टीझर दाखवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा टीझर ५८ सेकंदांचा असेल असंही सांगितलं जात आहे.

‘डंकी’चा आणखी एक टीझर सेन्सॉरकडून पास करून घेण्यात आला आहे ज्याची लांबी १ मिनिटं ४९ सेकंद अशी आहे. या दोन टीझरनंतर याचा ट्रेलर लोकांच्या भेटीला येईल असं सांगितलं जात आहे. शाहरुखचे चाहते आणि सिनेप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. ‘डंकी’च्या बरोबरीनेच प्रभासचा ‘सालार’सुद्धा प्रदर्शित होणार आहे त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ‘डंकी’मध्ये शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

Story img Loader