‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसदानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट आहेत. यापैकी शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील फर्स्ट लूकची प्रेक्षकांनी प्रशंसा केली. ‘जवान’ हा चित्रपट शाहरुख खानचा या वर्षातील दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असल्याचं स्पष्ट झालं आहे. मध्यंतरी ‘जवान’च्या सेटवरील बरेच फोटो लीक होत असल्याचं आपण पाहिलं आहे. आता या चित्रपटाबद्दल एक वेगळीच माहिती समोर आली आहे. ‘जवान’ची कथा नेमकी काय असू शकते याबद्दल खुलासा करण्यात आला आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या एका जुन्या चित्रपटावरुन प्रेरित असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Dev Anand Birth Anniversary
Dev Anand : ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया!’ चॉकलेट हिरो देव आनंद यांना आठवताना!
Tejaswini Pandit film Yek Number will be screened on october 10
तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचे १० ऑक्टोबरला प्रदर्शन
marathi movie Phulvanti will be released on October 11
‘फुलवंती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या

आणखी वाचा : Photos : आहाना कुमराचा खास ‘फिल्मफेअर’ लूक; निळ्या ड्रेसमधला अभिनेत्रीचा बोल्ड ग्लॅमरस अंदाज चर्चेत

‘बॉलिवूड हंगामा’च्या खात्रीशीर सुत्रानुसार अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ हा अमिताभ बच्चन यांच्या ‘आखरी रास्ता’ या चित्रपटावरुनच प्रेरित आहे. बिग बी यांचा हा चित्रपटही कमल हासनच्या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. आता याच कथानकाशी मिळतं जुळतं कथानक आपल्याला ‘जवान’मध्ये बघायला मिळू शकतं. ‘आखरी रास्ता’प्रमाणे ही कथाही वडील आणि मुलाची आहे, ज्यात मुख्य अभिनेत्याची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे.

अर्थात ‘जवान’ काही या चित्रपटांची कॉपी किंवा रिमेक नाही. अॅटली यांनी फक्त या चित्रपटापासून प्रेरणा घेत एक वेगळं कथानक मांडल्याचंही सांगितलं जात आहे. ‘जवान’च्या चित्रीकरणाला झालेला उशीर आणि कोविडदरम्यान झालेले बदल यामुळे ‘जवान’ ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होणार नाही अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती, पण जवान हा २ जूनला प्रदर्शित होणार हे नक्की झाले आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘जवान’चा नवीन टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशी चर्चा आहे. या टीझरमधून या चित्रपटाबद्दल आणखी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं म्हंटलं जात आहे. ‘जवान’मध्ये शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हर, सान्या मल्होत्रा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच दीपिका पदूकोण आणि अल्लू अर्जुन यांचा कॅमिओदेखील यात बघायला मिळणार असल्याची शक्यता आहे.