बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेता नुकताच ‘डंकी’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सौदी अरेबियात होता. तिथे तो उमराह करण्यासाठी मक्का इथं गेला होता. आता शाहरुखने वैष्णोदेवीच्या दरबारात हजेरी लावली आहे. त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये शाहरुख खान काळे कपडे घालून दिसत आहे. शाहरुख खानचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गजबजलेल्या ठिकाणी शाहरुख खानला पाहून गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून त्याने चेहरा लपवून डोळ्यांवर चष्मा लावला आहे. हा व्हिडीओ काल रात्री उशिराचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शाहरुखने वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्याचं म्हटलं जातंय. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत काही जण रस्ता मोकळा करत असतात आणि त्यांच्यासह एक जॅकेट घातलेली व्यक्ती दिसत आहे. चाहत्यांच्या मते हा शाहरुख खानच आहे. पण व्हिडीओत अभिनेत्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये.
…अन् मीरा राजपूतने दीर इशान खट्टरच्या कानाखाली लगावली, शाहिद कपूरही पाहतच राहिला!
या महिन्याच्या सुरुवातीला शाहरुख खान त्याच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सौदी अरेबियात होता. तिथले शेड्यूल पूर्ण केल्याची माहिती शाहरुखने एका व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. यानंतर तो मक्का या पवित्र शहरात उमराह करताना दिसला होता. उमराहसाठी पोहोचलेल्या शाहरुखचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.