शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट त्याच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात तिने भगवा रंगाची बिकिनी घातल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका बरोबरच जॉन अब्राहमदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. पण आता शाहरुखने बॉलिवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्याची आठवण काढत तो या चित्रपटाचा भाग नाही म्हणून दुःख व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पठाण’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. त्यानंतर हळूहळू या चित्रपटातील स्टारकास्ट समोर आली. पण आता शाहरुखला आणखी एक आघाडीचा बॉलिवूड अभिनेता या चित्रपटात असायला हवा होता असं समोर आलं आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’ चित्रपटात कॅमिओ करण्यासाठी सलमान खानने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा ऐकून व्हाल आश्चर्यचकित

शाहरुख खान नुकताच फिफा वर्ल्डकप फायनल पाहायला गेला होता. तिकडे त्याने ‘पठाण’चं जोरदार प्रमोशन केलं. यावेळी त्याने एक मुलाखत दिली. तेव्हा सूत्रसंचालकाने बॉलिवूडमधील काही आघाडीच्या अभिनेत्यांची मिमिक्री करत शाहरुखला प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची शाहरुखने अगदी भन्नाट उत्तरं दिली.

हेही वाचा : गर्लफ्रेंड सबा आझाद आणि दोन्ही मुलांना घेऊन हृतिक रोशन परदेशात रवाना, नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का

सूत्रसंचालकाने हृतिक रोशनची मिमिक्री करत शाहरुखला विचारलं, “मला या चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला…तू उत्कृष्ट काम केलं आहेस. प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करणारा हा ट्रेलर आहे. यात अजून कशाची कमी आहे का ?” त्यावर शाहरुख म्हणाला, “‘वॉर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर असं वाटतं की ‘पठाण’ चित्रपटात हृतिक रोशनची कमी आहे.” त्याच्या या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan wants hrithik roshan to he a part of pathaan rnv