शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात मध्यरात्री दोन तरुण घुसल्याचा प्रकार घडला आहे. २ मार्चच्या मध्यरात्री दोन तरुण सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत भिंतीवरून उडी घेत शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यामध्ये शिरले. हे दोघेही ‘मन्नत’च्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. घरी सुरक्षा रक्षक असतानाही ही घटना घडली होती. पण हे घडलं तेव्हा शाहरुख नेमका कुठे होता, याबाबत माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात मध्यरात्री दोघांची घुसखोरी, सुरक्षा असूनही घटना घडल्याने खळबळ

‘टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा दोन्ही अज्ञात तरुण ‘मन्नत’च्या भिंतीवरून उडी मारून आत शिरले तेव्हा शाहरुख खान तिथे नव्हता. तो त्याच्या ‘जवान’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. ही गोष्ट मध्यरात्री घडली होती आणि शाहरुख पहाटे शूटवरून परत आला. तोपर्यंत ‘मन्नत’च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन्ही घुसखोरांना पकडलं होतं. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

“महाराष्ट्रात एका स्त्रीची…” गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर ज्येष्ठ कलावंत मंगला बनसोडेंची संतप्त प्रतिक्रिया

दोघेही बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले होते. सिक्युरिटीने हे दोघांनाही लपून बसल्याचं पाहिल्यानंतर त्यांना पकडण्यात आलं. दोघांना पकडून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांचे वय २१ ते २५ वर्षे आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. बंगल्यात अनधिकृत प्रवेशासह भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांखाली पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan was shooting for jawan when 2 man allegedly entered in mannat bungalow hrc
Show comments