शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये शाहरुख व्यग्र आहे. ‘पठाण’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच तो इंटरनॅशनल टी-२० (I League T20)च्या उद्धाटनाला पोहोचला होता. यावेळी शाहरुखच्या घडाळ्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : आधी म्हटलं दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर नवऱ्याचं अफेअर, आता राखी सावंतने कॅमेऱ्यासमोरचं केलं आदिलला किस, व्हिडीओ व्हायरल

कलाकार मंडळींची लाइफस्टाइल कशी आहे हे जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना अधिक रस असतो. शाहरुखची तर लाइफस्टाइल, त्याचे कपडे तसेच तो वापरत असलेल्या वस्तूंची बी-टाऊनमध्ये सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते. आताही असंच काहीसं घडलं आहे. इंटरनॅशनल टी-२०च्या उद्घाटन कार्यक्रमाला त्याने घातलेलं घड्याळ विशेष लक्षवेधी होतं.

शाहरुख खानच्या घडाळ्यांची किंमत किती?

टी-२०च्या उद्घाटन कार्यक्रमामधील शाहरुखचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. या फोटोंमध्ये त्याने घातलेल्या घडाळ्याची किंमत ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. शाहरुखने ऑडेमॉर्स पिग्यूट (AP) या ब्रँडचं घड्याळ घातलं होतं. या घडाळ्याची किंमत कोटी रुपयांच्या घरात आहे.

आणखी वाचा – ‘वेड’ चित्रपट बनवण्यासाठी रितेश देशमुखने खर्च केले इतके कोटी रुपये, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही घसघशीत वाढ

या घडाळ्याची रिटेल किंमत १ कोटी १९ लाख रुपये आहे. तर मार्केटमधील किंमत ४ कोटी ९५ लाख रुपये इतपत आहे. शाहरुखच्या या महागड्या घडाळ्याची किंमत खरंच थक्क करणारी आहे. सध्या शाहरुख आणि त्याच्या या घडाळ्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan watch which he put on wrist during i league t20 opening ceremony know about price see details kmd