बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूपच चर्चेत आहे. त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने विक्रम रचला. या चित्रपटाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली. तर शाहरुख आता ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट घेऊन येत प्रेक्षकांचं हे वर्ष मनोरंजक करणार आहे. आता त्याच्या आगामी चित्रपटाच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे ‘पठाण’मध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत दिसलेला शाहरुख खान त्याच्या पुढील चित्रपटात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यापैकी त्याचा ‘डंकी’ हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होईल. ‘डंकी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी करत आहेत. गेले अनेक महिने शाहरुखबरोबर ते या चित्रपटावर काम करत आहेत. आता या चित्रपटात तो कोणत्या प्रकारची भूमिका साकारेल हे समोर आलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…

आणखी वाचा : तब्बल १८ वर्षानंतर शाहरुख खान ‘या’ दिग्गज कलाकारांबरोबर शेअर करणार स्क्रीन

‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार, ‘डंकी’ या चित्रपटात शाहरुख आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसेल. ‘डंकी’ ही त्या लोकांची कथा आहे ज्यांना घरी परत यायचं आहे. या चित्रपटाच्या घोषणे वेळी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यात शाहरुखच्या पँटपासून टी-शर्टपर्यंतच्या लूकवरून तो एका लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल असं समजतं. तर आता शाहरुखने पुन्हा एकदा लष्कर अधिकाऱ्याची भूमिका सकरण्यासाठी तो उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा : Video: शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘जवान’ चित्रपटातील अंडरवॉटर सिक्वेन्स लीक?; व्हिडीओ चर्चेत

शाहरुख खानने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने ‘फौजी’, ‘मैं हूं ना’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटांमध्ये अशा प्रकारची भूमिका साकारली आहे. तर आता पुन्हा एकदा तो या भूमिकेत दिसणार हे कळल्यावर त्याचे चाहते खुश झाले आहेत. दरम्यान, या त्याच्या आगामी चित्रपटात शाहरुख खानबरोबर विकी कौशल, तापसी पन्नू आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होईल.