बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा सोशल मीडियावर ती आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी गौरीने इस्टाग्रामवर आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर केला होता. या फोटोत शाहरुख, गौरी आणि त्यांची तीन मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम होते. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. चाहत्यांनी या फोटोवर जोरदार कमेंट केली होती. आता शाहरुख खाननेही या फोटोवर मजेशीर कमेंट केली आहे.
हेही वाचा- परिणीता चोप्रा-राघव चड्ढा यांची लगीनघाई! दिल्लीत सुरू आहे साखरपुड्याची जय्यत तयारी
गौरीने काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर केला होता. कॅपशनमध्ये गौरीने लिहिले होते. “कुटुंब हे घर बनवते… पेंग्विनइंडिया कॉफी टेबल बुकसाठी उत्सुक… लवकरच येत आहे.” गौरीच्या या पोस्टवर शाहरुख खानने मजेशीर कमेंट केली आहे.किंग खानने लिहिले, “यार गौरी तू सुंदर मुलं बनवलीस!!!! या जोडप्याला आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान अशी तीन मुले आहेत.
गौरीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. फिल्ममेकर फराह खानने लिहिले, “नजर काढा.” त्याचबरोबर अभिनेत्री प्रीती झिंटा, करिश्मा कपूर, अमृता राव, चित्रपट निर्माती झोया अख्तर, गायिका शिल्पा राव आणि डिझायनर मनीष मल्होत्रा यांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.
इंटिरियर डिझायनर गौरी खान लवकरच ‘माय लाइफ इन डिझाईन’ नावाचे नवीन कॉफी टेबल बुक लॉन्च करणार आहे. एबरी प्रेसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातून वाचकांना त्यांचा प्रवास जाणून घेता येणार आहे. या पुस्तकात खान कुटुंबाची खास छायाचित्रेही असतील. ज्यामध्ये शाहरुख, त्याची तीन मुले आणि त्याचे मुंबईतील प्रसिद्ध घर, मन्नत यांचा समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे शाहरुखने गौरीच्या पुस्तकाचा अग्रलेख लिहिला आहे, ज्यामध्ये तिचे काही खास डिझाईन प्रोजेक्ट फोटोंसह दाखवले जाणार आहेत. गौरीने इंटिरिअर डिझायनर बनू इच्छिणाऱ्यांसाठी टिप्सही शेअर केल्या आहेत. तिच्या काही प्रसिद्ध बॉलीवूड ग्राहकांमध्ये करण जोहर, जॅकलीन फर्नांडिस, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रणबीर कपूर यांचा समावेश आहे.