किंग खान शाहरुख खानने तब्बल ४ वर्षांनी ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दणक्यात कमबॅक केलं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. असाच एक शाहरुख खानचा चित्रपट आहे जो बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला पण नंतर मात्र त्याला कल्ट क्लासिकचा दर्जा प्राप्त झाला. शाहरुख खान आणि जुही चावलाच्या याच ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ चित्रपटाला आजच २३ वर्षं पूर्ण झाली आहेत.
या चित्रपटाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही, पण नंतर मात्र टेलिव्हिजनच्या माध्यमातून हा चित्रपट लोकांना खूप पसंत पडला. यानिमित्त या चित्रपटाचे कथा आणि पटकथालेखक मनोज लालवानी यांनी ‘बॉलिवूड हंगमा’शी संवाद साधला. या मुलाखतीमध्ये चित्रपटाशी जोडलेल्या आठवणी त्यांनी शेअर केल्या शिवाय या हा चित्रपट तेव्हा का फ्लॉप ठरला याबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे.
याबद्दल मनोज म्हणाले, “हा चित्रपट फ्लॉप झाल्याने सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला, शाहरुखच्या प्रोडक्शन कंपनीचा ह पहिलाच चित्रपट होता. तेव्हाच्या प्रेक्षकांना हा चित्रपट तितकासा आपला वाटला नाही. आज लोक याविषयी ट्विटरवर चर्चा करत आहेत. हा चित्रपट दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी टेलिव्हिजनवर दाखवला जातो. आज सगळीकडे याचं कौतुक होत आहे पण तेव्हा चित्रपटगृहात याला अत्यंत थंड प्रतिसाद होता. त्याकाळात पत्रकारिता या क्षेत्रातील वैर आणि टीआरपीसारख्या गोष्टी लोकांना ठाऊक नव्हत्या, आज मात्र सगळ्यांच्या आयुष्याचा तो एक अविभाज्य भाग बनला आहे.”
पुढे मनोज म्हणाले, “या चित्रपटाचं तेव्हा काही लोकांनी कौतुक केलं, पण बहुतांश प्रेक्षकांना ज्यांना आपण मास ऑडियन्स म्हणतो त्यांना हा चित्रपट समजलाच नाही. चित्रपटात शाहरुख असल्याने त्यांना एक लव्हस्टोरी अपेक्षित होती. हे फक्त आमच्याबाबतीतच घडलं आहे असं नाही. गुरुदत्त यांचा ‘कागज के फूल’ आणि राजकुमार संतोषी यांचा ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटांच्या बाबतीतही हेच झालं.” अजीज मिर्झा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शाहरुख खान, जुही चावलासह या चित्रपटात दलिप ताहील, सतीश शाह, परेश रावल, जॉनी लिव्हर, अतुल परचुरे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.