बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणचा ‘शैतान’ चित्रपट ८ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच अजय देवगण आणि आर माधवनची जोडी पाहायला मिळाली. आजपर्यंत नायक म्हणून लोकप्रिय ठरलेल्या आर माधवनने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काळी जादू, वशीकरण यावर आधारित असलेला हॉरर आणि थ्रिलर ‘शैतान’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे आणि याचा प्रतिसाद बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतोय. ‘शैतान’ चित्रपटाने या तीन दिवसांत ५० कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली आहे.

हेही वाचा… अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ चेहरा लपवत आले माध्यमांसमोर; नेटकरी म्हणाले, “असं कामच का…”

अजय देवगण आणि आर माधवनचा ‘शैतान’ हा ‘वश’ या गुजराती चित्रपटाचा रीमेक आहे. ‘वश’ १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता, परंतु हा चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. ‘वश’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जानकी बोडीवालाने ‘शैतान’मध्येसुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

शक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, रविवारी ‘शैतान’ चित्रपटाने २० कोटींच्या घरात कमाई केली. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १४.७५ कोटी कमावले होते, तर दुसऱ्या दिवशी १८.७५ कोटी या चित्रपटाने आपल्या नावावर केले. या संपूर्ण तीन दिवसांमध्ये ‘शैतान’ने ५३.५० कोटींची कमाई केली आहे. ६० ते ६५ कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट लवकरच आपली कमाई पूर्ण करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… हिरवा चुडा, मेहेंदीने रंगलेले हात… पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो; म्हणाली, “अजूनही…”

दरम्यान, ‘शैतान’ चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, हा चित्रपट काळी जादू, वशीकरण आणि अंधविश्वासावर आधारित आहे. अजय देवगणने या चित्रपटात पित्याची भूमिका साकारली आहे, तर आर माधवन वनराज नावाच्या खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. ‘शैतान’ चित्रपटात ज्योतिका सदाना-सर्वणन, जानकी बोडीवाला, अंगद राज यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaitaan box office collection day 3 ajay devgan r madhavan shaitaan collected 53 crores dvr