बॉलीवूडमधील काही जोडपी आजही लोकप्रिय आहेत. यापैकी अभिनेते शक्ती कपूर(Shakti Kapoor) व शिवांगी कोल्हापूरे हे एक जोडपे आहे. आता त्यांच्या लग्नाला ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, त्यांच्या लग्नाच्या वेळी शिवांगी कोल्हापूरे यांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. याबरोबरच शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरे यांनी त्यांचे अभिनय व गायनाचे करिअर सोडले, असा खुलासा अभिनेते शक्ती कपूर यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले शक्ती कपूर?

शक्ती कपूर यांनी टाइमआऊट विथ अंकित या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी शिवांगी यांच्याबरोबर पहिली भेट किस्मत चित्रपटाच्या सेटवर झाल्याचे म्हटले आहे. शक्ती कपूर यांनी म्हटले, “जेव्हा मी तिला भेटलो होतो, त्यावेळी ती बालकलाकार होते. मी मोठी व्यक्तिरेखा साकारत होतो. ती माझ्यापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. आम्ही भेटलो, प्रेमात पडलो. मी स्वत:शीच विचार केला की इतकी प्रेमळ व सुंदर मुलगी मी कुठे शोधू शकणार आहे? एक दिवस मी तिला सांगितले की, मला कामात व्यत्यय निर्माण होत आहे आणि मला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, त्या गोष्टीचा तिला खूप राग आला.”

पुढे शक्ती कपूर यांनी शिवांगी कोल्हापूरे यांना लग्नाची मागणी कशी घातली, याबद्दलदेखील सांगितले. शक्ती कपूर यांनी म्हटले, “मी तिच्याकडे गेलो, माफी मागितली आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचे आहे हे सांगितले. याबरोबरच तिला हेही सांगितले की मला ती एक गृहिणी म्हणून हवी आहे. आम्ही कोर्टात लग्न केले. त्यानंतर सगळ्यांनी आमचे लग्न स्वीकारले. तिने तिचे गायनाचे व इतर करिअर सोडून दिले, त्यासाठी आजही मी तिचे हात जोडून आभार मानतो.

हेही वाचा: Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ

शिवांगी कोल्हापूरे या मराठी कुटुंबातून येतात, तर शक्ती कपूर हे पंजाबी कुटुंबातून येतात. त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबातून विरोध होता. १९८२ ला या जोडप्याने लग्नगाठ बांधली आहे. शक्ती कपूर व शिवांगी कोल्हापूरे यांना सिद्धांत कपूर व श्रद्धा कपूर ही दोन मुले आहेत. श्रद्धा कपूर सध्या बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakti kapoor on marriage with shivangi kolhapure reveals i went to her and begged her she gave up her singing career and everything else for me nsp