रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. या चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन हे ६०० कोटींच्या घरात गेले असून लवकरच ७०० कोटींचा टप्पाही हा चित्रपट पार करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ‘डंकी’ यशस्वी व्हावा म्हणून शाहरुख खानने गुपचुप घेतले वैष्णोदेवीचे दर्शन; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

चित्रपट जरी जबरदस्त कमाई करत असला तरी यावर प्रचंड टीकादेखील होत आहे. चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटीजनीदेखील यावर टीका केली असून काहींनी याचं कौतुक केलं आहे. अल्लू अर्जुनपासून राम गोपाल वर्मापर्यंत कित्येकांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. खासकरून चित्रपटातील प्रमुख अभिनेता रणबीर कपूरच्या कामाचं लोकांनी कौतुक केलं आहे. आता या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या शक्ति कपूर यांनीदेखील रणबीरबद्दल भाष्य केलं आहे.

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान शक्ति कपूर यांनी ऋषी कपूर यांची आठवण काढत रणबीरचं कौतुक केलं आहे. ‘ईटाइम्स’शी संवाद साधताना शक्ति कपूर म्हणाले, “हा अनुभव फारच अप्रतिम होता, अन् मला सुरुवातीपासूनच ठाऊक होतं की हा चित्रपट सुपरहीट ठरणार. पहिल्याच दिवशी जेव्हा मी संदीप रेड्डी वांगासाठी शॉट दिला तेव्हाच मी त्याला बोललो की हा चित्रपट जबरदस्त व्यवसाय करणार.”

पुढे पिता-पुत्र म्हणजेच रणबीर आणि ऋषी कपूर यांच्या नात्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “चिंटू हा माझ्यापेक्षा फक्त एका दिवसाने लहान होता. त्याचं त्याच्या मुलाबरोबर असलेलं नातं फार वेगळं होतं. आम्हा दोघांचे कुटुंबही बऱ्याचदा फिरायला एकत्र जायचे. आज रणबीरने जे कामावलं आहे ते पाहण्यासाठी चिंटू इथे हवा होता असं मला प्रकर्षाने जाणवतं. त्याचा मुलगा सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे याचा मला अभिमान वाटतो.”

एकूणच या चित्रपटाबद्दल सेलिब्रिटीजमध्येसुद्धा दोन वेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहे. लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakti kapoor praises work of ranbir kapoor in animal says he wish chintu was alive avn