शक्ती कपूर अनेक वर्षांपासून विनोदी व खलनायकाच्या भूमिका करीत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी अनेकदा पडद्यावर खलनायक साकारला असला तरी खऱ्या आयुष्यात ते विनोदी आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत. त्यांच्या या स्वभावाची आणि लाडकी लेक श्रद्धा हिची त्यांच्याशी असलेल्या बॉण्डिंगची नेहमी चर्चा होते. श्रद्धा कपूरने एकदा शक्ती कपूर यांना एक सल्ला दिला होता. तो सल्ला मनावर घेत, त्यांनी आपल्या लेकीला एक गोष्ट सिद्ध करून दाखविण्यासाठी ते एक महिना बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते.

शक्ती कपूर २०११ मध्ये बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. ‘बिग बॉस सीझन ५’ मद्ये ते स्पर्धक होते आणि शोच्या प्रीमियरच्या वेळी त्यांनी सांगितले की, श्रद्धानेच त्यांना या शोचा भाग होण्यासाठी प्रोत्साहन दिले.

हेही वाचा…विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”

शक्ती कपूर यांना श्रद्धा कपूरने एकदा दारू सोडण्याचा सल्ला दिला होता. याच कारणामुळे ते या शोमध्ये सहभागी झाले होते. शक्ती कपूर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारे पाचवे स्पर्धक ठरले. ते घरात २८ दिवस होते. शोमधून बाहेर पडल्यानंतर शक्ती यांनी सांगितले होते की, श्रद्धाला त्यांचा अभिमान आहे. कारण- त्यांनी शोदरम्यान एक महिना दारूला हात लावला नाही. ‘रेडिफ डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ते हा शो जिंकण्यासाठी नव्हे, तर ते एक महिना दारू सोडू शकतात हे आपल्या मुलांना दाखविण्यासाठी सहभागी झाले होते.

शक्ती म्हणाले, “ मला श्रद्धाला हे सिद्ध करून दाखवायचे होते की मी एक महिना दारू न पिता राहू शकतो. त्यामुळे हा शो जिंकण्यासाठी नाही, तर माझ्या मुलांना मी दारू न पिता एक महिना राहू शकतो हे दाखविण्यासाठी मी या शोमध्ये सहभागी झालो होतो. मी स्वतःला सिद्ध करू शकलो. तसेच, मला आनंद झाला की, मी कॅप्टन असताना घरात कोणतेही भांडण झालं नाही. आता माझी मुलगी श्रद्धा म्हणते की, पुढच्या जन्मातही ती माझीच मुलगी म्हणून जन्म घ्यायला इच्छुक आहे.”

हेही वाचा…हॉलीवूड अभिनेत्रीने सहकलाकारावर केले लैंगिक छळाचे आरोप; कंगना रणौत यांनी दिला अभिनेत्रीला पाठिंबा, म्हणाल्या…

त्यांनी असेही सांगितले की, त्यांच्या पत्नीला त्यांच्या शोमधील वागणुकीचा अभिमान आहे. “माझ्या पत्नीला माझा अभिमान आहे आणि मी शोमध्ये जसा स्वत:ला सावरलं, त्याबद्दल ती खूप खूश आहे. ती म्हणाली की, तिला माझ्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम आहे,” असे त्यांनी त्या मुलाखतीत म्हटले.

हेही वाचा…Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का नाकारला? ३१ वर्षांनी आलं कारण समोर; म्हणाली, “मी आणि शाहरुखने…”

गेल्या काही वर्षांत शक्ती कपूर फारशा चित्रपटांमध्ये दिसले नाहीत. मात्र, २०२३ मध्ये आलेल्या संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात ते झळकले, ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता.

Story img Loader