प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरी यामधील काही संवाद आणि दृश्यांबाबत सोशल मीडियावर गोंधळ सुरु आहे. चित्रपटातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर आता ‘शक्तिमान’ची भूमिका साकारलेल्या मुकेश खन्ना यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : १८ वर्षांनी तमन्ना भाटियाने का मोडला ‘नो किसिंग पॉलिसी’चा नियम? अभिनेत्री खुलासा करीत म्हणाली…

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
Mallikarjun kharge
Acharya Pramod Krishnam : “खरे हिंदू…”, मल्लिकार्जुन खरगेंवर काँग्रेसच्या माजी नेत्याचीच टीका!
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे

‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे वाद सुरु असताना ‘शक्तिमान’ची भूमिका साकारत असलेल्या मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. मुकेश खन्ना यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “‘आदिपुरुष’ हा सध्याच्या युगातील सर्वात विनोदी चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे आपला पवित्र ग्रंथ वाल्मिकी रामायणाचा घोर अपमान आहे. सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला परवानगी कशी दिली? प्रेक्षक या लोकांना माफ करतील का? या सगळ्यात महागड्या चित्रपटाला प्रेक्षकवर्ग नक्की फ्लॉफ ठरवेल.”

हेही वाचा : “विकी-कतरिनासह आलिया करतेय गॉसिप?” एअरपोर्टवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “रणबीरची तक्रार…”

मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, “‘आदिपुरुष’मध्ये हनुमानजींचे संवाद अगदी टपोरी भाषेत लिहिले आहेत. रामायणातील पात्र असे संवाद बोलतात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले, ‘आदिपुरुष’ चित्रपट हा तमाशा आहे, यापेक्षा मोठा तमाशा असूच शकत नाही. ओम राऊत यांना काहीच रामायण कळत नाही हे यावरून समजते. राऊत साहेबांवर हॉलिवूडचा जास्त प्रभाव आहे असे चित्रपट पाहून दिसते.” मुकेश खन्ना यांनी चित्रपटातील सर्वच पात्रांवर टीका केली आहे.

हेही वाचा : “प्रेम, मैत्री आणि दु:ख…” बहुचर्चित ‘द आर्चीज’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ३ स्टारकिड्सचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

दरम्यान, आदिपुरुष चित्रपटात प्रभासने प्रभू श्रीराम यांची, क्रिती सेनॉनने माता सीतेची, सैफ अली खानने रावणाची व देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे.