अभिनेत्री शालिनी पांडेने (Shalini Pandey) नुकताच आमिर खानचा मुलगा जुनैद खानबरोबर ‘महाराज’ या चित्रपटात काम केले. या सिनेमातून जुनैदने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अलीकडील एका मुलाखतीत शालिनीने आमिर खानशी (Aamir Khan) संबंधित एक गमतीशीर घटना सांगितली. यात तिने आमिर खानलाच ओळखले नाही असे सांगितले.

‘बॉलीवूड हंगामा’च्या अभिनेत्रींच्या राऊंडटेबल मुलाखतीदरम्यान शालिनीने ‘महाराज’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जुनैद खानशी (Junaid Khan) झालेल्या मैत्रीविषयी सांगितले. या चित्रपटाच्या यशानंतर घडलेल्या एका मजेशीर प्रसंगाची आठवण सांगताना तिने आमिर खानच्या मेसेजचा किस्सा उलगडला. चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित पार्टीसाठी आमिरने तिला आमंत्रित करण्यासाठी मेसेज केला होता. मात्र, त्यांच्या संभाषणात अशी एक गंमत घडली की, सुरुवातीला शालिनीला हा मेसेज आमिर खानचाच असल्याचे लक्षातच आले नाही!

हेही वाचा…एकेकाळी ज्याला म्हटलं ‘झुरळ’, आता त्याच अभिनेत्याच्या चित्रपटाचं खासदार कंगना रणौत यांनी केलं कौतुक; म्हणाल्या…

या मुलाखतीत हा प्रसंग आठवत शालिनी म्हणाली, “मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते. मी काहीच दिवसांपूर्वी जुनैदबरोबर एका सिनेमात काम केलं आहे, त्यामुळे तो माझा चांगला मित्र आहे. आम्ही एका पार्टीला जायचं ठरवलं होतं. तेव्हा मला आमिर सरांचा मेसेज आला, ‘तू पार्टीला येणार का?’ मी विचारलं, ‘कोण बोलतंय?’ त्यावर ते म्हणाले, ‘जुनैदचा बाबा.’ मी परत विचारलं, ‘कोण जुनैदचा बाबा?’ आणि मग ते म्हणाले, ‘आमिर खान!’”

शालिनीने सांगितले की, तिला समोरचा माणूस सुपरस्टार आमिर खान बोलतोय हे समजायला थोडा वेळ लागला. मात्र, आमिरने या संभाषणादरम्यान सुपरस्टारचा आव न आणता तिच्याशी साधेपणाने संवाद साधला . शालिनी पुढे म्हणाली, “मी त्यांना लगेच म्हटलं, ‘सॉरी, सर!’ ते जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले, ‘नाही, नाही… मी तुझा काका आहे, मी जुनैदचा बाबा आहे!’ काही क्षणांसाठी मला खरंच विसर पडला होता की, जुनैदचे बाबा म्हणजे आमिर खान आहेत!”

हेही वाचा…सनी लिओनीने केली नव्या वास्तूची पूजा, मुलांसह म्हटले मंत्र; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ती त्यांना संस्कृती…”

‘महाराज’ चित्रपटात शालिनीने किशोरीची भूमिका साकारली होती. तर, जयदीप अहलावतने मुख्य खलनायकाची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माण झालेला हा चित्रपटाचे समीक्षक आणि प्रेक्षकांनी कौतुक केले होते.

Story img Loader