शिल्पा शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या तिच्या लव्ह लाइफमुळे बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शमिता शेट्टी एका पार्टीमधून बाहेर पडताना दिसली होती आणि त्यावेळी तिच्याबरोबर आमिर अली दिसला होती. तो गर्दीतून तिला कारपर्यत सोडायला गेला होता. त्यानंतर शमिता आणि आमिर यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. नुकतेच तिने बोल्ड सीन्सवर भाष्य केलं आहे.

‘मोहब्बतें’ या चित्रपटातून शमिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही तिला मिळाला होता. याच चित्रपटात तिचा अभिनेता उदय चोप्राबरोबर किसिंग सीन होता. त्याबद्दल ती म्हणाली, “मला चांगलं आठवतं आहे की माझ्या किसिंग सीनमुळे माझे वडील माझ्याशी बोलत नव्हते. महिनाभर ते माझ्याशी बोलले नाहीत. मी माझ्या वडिलांच्या खूप जवळ असल्यामुळे ते माझ्याशी न बोलल्याने ते अस्वस्थ होते.”

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

Dadasaheb Phalke Award 2023 : ‘द काश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्यावर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “दहशतवाद पीडितांना… “

ती पुढे म्हणाली, “पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे चित्रपटांमध्ये ही गोष्ट सामान्य होत गेली. हे बाबांनाही समजले, पण त्यानंतर मी कोणालाच ऑनस्क्रीन किस केले नाही.” झूमला दिलेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला आहे.

शमिता शेट्टी शेवटची टेनंटमध्ये दिसली होती आणि तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. शमिता ‘बिग बॉस ओटीटी’नंतर राकेश बापटला डेट करत होती. शोदरम्यान दोघांची भेट झाली होती, मात्र आता दोघेही वेगळे झाले आहेत.

Story img Loader