अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने मनोरंजन सृष्टीत चांगलं नाव कमावलं. अनेक चित्रपटांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली. शिल्पा नंतर काही वर्षांनी तिची बहीण शमिता शेट्टी हिने देखील मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं. पण शिल्पा इतकं यश तिच्या वाट्याला आलं नाही. आता यावर शमिताने मोकळेपणाने भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मोहब्बतें’ या चित्रपटातून शमिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही तिला मिळाला होता. त्यानंतर ती काही चित्रपटांमध्ये झळकली पण ती गेली अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मध्यंतरी ती ‘बिग बॉस’च्या घरात दिसली. तेव्हा देखील चित्रपट सृष्टीपासून ती लांब असल्याची मोठी चर्चा रंगली होती. आता शमिताने यामागील सत्य सांगितलं आहे.

आणखी वाचा : Video: “मला आई व्हायचं होतं पण त्याने…” राखी सावंतचा आदिल खानबद्दल मोठा खुलासा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, ” मी ‘यशराज फिल्म्स’च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु त्यानंतर मला माझ्या अपेक्षेप्रमाणे काम मिळालं नाही. ‘महोब्बतें’च्या वेळी मला अभिनय करायला किती आवडतो हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. ‘जहर’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मला माझ्यातली अभिनयाची आवड जाणवली. कामाच्या बाबतीत थोडी हवरट झाले. मी आणखीन काम करू इच्छित होते पण इंडस्ट्रीमधून मला काम मिळालं नाही. मला हव्या तशा गोष्टी घडत नव्हत्या.”

हेही वाचा : शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसाच्या दिवशी, शमिता आणि राकेश बापटचा झाला ब्रेकअप?

पुढे ती म्हणाली, “माझ्या चित्रपटांमध्ये नेहमीच तीन-चार वर्षाचं अंतर राहिलं आहे. माझ्या दर चित्रपटाच्या वेळी प्रेक्षकांनी मला म्हटलं की हे तुझं पुनरागमन आहे. परंतु मी जास्तीत जास्त काम करू इच्छित होते.” शमिता २००७ मध्ये ‘कॅश’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली. त्यानंतर ती आता १६ वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘द टेनंट’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shamita shetty shared her career journey in an interview rnv