हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कपूर घराण्याबद्दलचा एक किस्सा हिंदी इंडस्ट्रीत खूप प्रचलित आहे की त्यांच्यापैकी एकाही सदस्याने शाळेनंतर शिक्षण घेतलेलं नाही. अर्थात यात कितपत तथ्य आहे हे कुणालाच ठाऊक नाही, पण नुकतंच दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांच्या मुलाने मात्र ही गोष्ट खोडून काढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शम्मी कपूर यांचे सुपुत्र आदित्य राज कपूर यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून ग्रॅजुएशन पूर्ण केलं असून ते आता पदवीधर झाले आहेत. आदित्य यांनीच शम्मी कपूर यांना इंटरनेटचा वापर करायला शिकवलं होतं. शम्मी कपूर हे ९० च्या दशकातील काही मोजक्या भारतीयांपैकी एक होते ज्यांनी पुरेपूर इंटरनेटचा वापर केला अन् याचं संपूर्ण श्रेय त्यांचे सुपुत्र आदित्य यांनाच जातं.

आणखी वाचा : “गदर २ ने सगळ्यांची…” करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, बॉलिवूडवर टीका करणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

आदित्य यांना कधीच चित्रपटात काम करण्यात रस नव्हता, त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला झोकून दिलं. ते एक उत्तम बाइकर आहेत. १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३ मध्ये आदित्य राज कपूर पत्नी प्रीती कपूरसह २१ ऑक्टोबरला मोटरसायकलवरून मुंबईहून निघाले आणि २५ दिवसांत दोघांनी पाच हजार किमीहून अधिक प्रवास केला. तेव्हा त्यांच्या फेसबुक पोस्टची चांगलीच चर्चा झाली होती.

शम्मी कपूरचा यांचे सुपुत्र आदित्य राज कपूर यांना कॉलेजमध्ये जाता आले नसले तरी त्यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी ‘इग्नू’मधून पदवी मिळवली आहे. भविष्यात एमए करण्याचाही त्यांचा निर्धार आहे. चित्रपटसृष्टीपासून आदित्य कायमच दूर असतात, क्वचितच ते पार्ट्यांमध्ये दिसतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shammi kapoor son aditya raj kapoor graduated at the age of 67 avn
Show comments