९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शांती प्रिया पुन्हा एकदा पडद्यावर परतली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ‘धारावी’ या सीरिजमधून तिने पुनरागमन केलं. आता ती लवकरच ‘सरोजिनी नायडू’मध्ये दिसणार आहे. शांती प्रियाने अक्षय कुमारबरोबर ‘सौगंध’मध्ये काम केलं होतं. लग्नानंतर ती अभिनयापासून दूर गेली, पण नंतर जेव्हा तिला पुनरागमन करायचं होतं आणि त्यासाठी अक्षयची मदत मागितली तेव्हा त्याने ती आता हिरोईन होऊ शकत नाही असे सांगून नकार दिला होता, असा दावा तिने केला होता. याबाबत बोलताना आता मला कोणालाही फुकटची प्रसिद्धी द्यायची नाही, असं शांती प्रिया म्हणाली.

‘जनसत्ता’ ला दिलेल्या मुलाखतीत शांती प्रियाने तिच्या करिअरबद्दल, अक्षय कुमारने मदत न केल्याच्या तिच्या विधानाबद्दल, अक्षयने सावळ्या रंगाची खिल्ली उडवली होती, याबाबत भाष्य केलं. अक्षय कुमारमुळे तुझ्या करिअरला ब्रेक लागला का? असं विचारलं असता ती म्हणाली, अक्षय कुमार त्याच्या कामात व्यग्र आहे. त्याने हे सगळं वाचलं असेल की नाही, याची मला कल्पना नाही. माझ्याकडे जे काम येणार असेल ते कोणीच रोखू शकणार नाही. मला माहीत आहे की मी प्रतिभावान आहे. मी हिंदीसह कन्नड, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटही करू शकते. कोणीच माझी जागा घेऊ शकत नाही. मला नाही वाटत की इतर कुणामुळे मला काम मिळत नाही.”

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी…”

शांती प्रिया पुढे म्हणाली, “आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत. तो माझा पहिला लाडका सह-कलाकार होता. तो किंवा मी एकमेकांना काही बोललो असेल तरी आता त्या गोष्टींना खूप वेळ झाला आहे. आम्ही लहान होतो. आता आमची मुलंही मोठी झाली आहेत. मी ते सर्व विसरले आहे, सर्व काही मागे सोडले आहे, माझ्या आयुष्यात पुढे गेले आहे आणि मला पुढेच जायचे आहे. भविष्यात कधी त्याला भेटण्याची संधी मिळाली तर मी त्याला नक्की भेटेन आणि या विषयावर बोलून सर्व शंका दूर करेन. मी माध्यमांना सांगू इच्छिते की मला कोणालाही फुकटची प्रसिद्धी द्यायची नाही. मला हे प्रकरण इथेच संपवायचं आहे. अक्षय कधी मला भेटला तर मी म्हणेन, ‘अरे अक्षय, हे सगळं मागे सोडून आपण एकत्रकाम करू,” असं शांती प्रिया अक्षय कुमारबरोबर काम करण्याबद्दल म्हणाली.

“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

वाढत्या वयाबरोबर अभिनेत्रींना काम न मिळण्याबद्दल शांती प्रिया म्हणाली, “आता हिरो किंवा हिरोईन कलाकार नसून कंटेंट हिरो बनला आहे. ९० च्या दशकात गोष्टी वेगळ्या होत्या. त्यावेळी कुणाचे लग्न झाले तरी भूमिका बदलायच्या.पण, आजच्या काळात असं नाही. आता कथा अधिक महत्त्वाची आहे. एक काळ असा होता की लोक हिरो- हिरोईनबद्दल विचारायचे, पण आता लोक कलाकारांबद्दल नाही तर कथेबद्दल बोलतात.”

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीबद्दल अक्षय कुमारने केली होती घाणेरडी कमेंट, अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली…

शांतीप्रिया ही ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘बाजीगर’ या लोकप्रिय चित्रपटांतील अभिनेते सिद्धार्थ रे यांची पत्नी आहे. तिने सिद्धार्थ यांच्याबरोबरही अनेक चित्रपट केले. लग्नानंतर काही वर्षांनीच सिद्धार्थ यांचे निधन झाले.

Story img Loader