‘आदिपुरुष’ चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु असून यामध्ये अभिनेता प्रभास यामध्ये प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. ‘आदिपुरुष’च्या हिंदी व्हर्जनसाठी प्रभास साकारत असलेल्या श्रीरामांच्या भूमिकेला मराठमोळा अभिनेता शरद केळकर याने आवाज दिला आहे. यापूर्वी शरद केळकरने प्रभासच्या ‘बाहुबली’ चित्रपटासाठी डबिंग केले होते. ‘आदिपुरुष’साठी डबिंग करण्याचा अनुभव कसा होता याबाबत अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘जय श्री राम’ गाण्याने केला नवा रेकॉर्ड, अवघ्या २४ तासांत…

अभिनेता शरद केळकरने हिंदुस्थान टाईम्सबरोबर संवाद साधताना सांगितले की, “प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी डबिंग करण्याची संधी मिळाले हे माझे भाग्य आहे. दिग्दर्शक ओम राऊतला पहिल्या दिवसापासूनच आदिपुरुषमधील प्रभासच्या भूमिकेसाठी माझा आवाज हवा होता. बाहुबलीमधील माझ्या आवाजाला प्रेक्षकांनी एवढे वर्ष लक्षात ठेवले आहे. आता यापुढे प्रेक्षक मला प्रभू श्री रामांच्या भूमिकेच्या आवाजासाठी लक्षात ठेवतील. डबिंगसाठी माझी निवड करण्यात आली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.”

हेही वाचा : “चित्रपटगृहांच्या मालकांना धमक्यांचे फोन…” ‘द केरला स्टोरी’चे निर्माते विपुल शाहांचा मोठा दावा, म्हणाले “बेकायदेशीर बंदी…”

अभिनेत्याने पुढे सांगितले, “आतापर्यंत कोणीही माझ्या डबिंगबद्दल तक्रार केलेली नाही. मला एकंदर चित्रपट चांगला वाटला मात्र, मला केवळ मी डबिंग केलेल्या भागांबद्दल माहिती आहे, उर्वरित पात्र आणि चित्रपट कसा आहे याबाबत कल्पना नाही. प्रभू श्री रामाच्या भूमिकेचे हिंदी डबिंग ऐकून प्रभासने मला मिठी मारुन माझे कौतुक केले, ही माझ्या कामाची सर्वात मोठी पोचपावती आहे.”

दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे. १६ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad kelkar hindi dubbed for prabhas character in adipurush sva 00