दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आजही प्रेक्षकांच्या आठवणीत कायम आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आजही त्याच्याबद्दल बोलताना आणि त्याच्या कामाचं कौतुक करताना दिसतात. सुशांत अशा काही बॉलिवूड कलाकारांपैकी एक होता ज्यांनी टीव्ही मालिकांमधून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडच्या हिट चित्रपटांपर्यंतचा प्रवास केला. नुकतंच प्रसिद्ध अभिनेता शरद केळकरने सुशांतसिंह राजपूतबद्दल बोलताना त्याचं आणि त्याच्या कामाचं कौतुक केलं.
अभिनेता शरद केळकरनेही त्याच्या करिअरची सुरुवात टीव्हीसृष्टीतूनच केली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शरद केळकरने सुशांतसिंह राजपूतचं कौतुक केलं. सुशांत अशा प्रभावी अभिनेत्यांपैकी एक होता ज्यांनी टीव्ही मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती. छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. एवढंच नाही तर तो यात यशस्वी झाला होता.
आणखी वाचा- “वाद निर्माण होईल असं…” शरद केळकर स्पष्टच बोलला, अजय देवगणबाबतही महत्त्वाचं विधान
शरद केळकर म्हणाला, “इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत फक्त दोनच अभिनेत्यांनी अशाप्रकारे काम केलं आहे. एक तर अभिनेता शाहरुख खान. त्याने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. त्यानंतर त्याने चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. दुसरा म्हणजे सुशांतसिंह राजपूत. सुशांतही त्याच्या दमदार अभिनयाच्य जोरावरच बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कमावण्यात यशस्वी ठरला होता. मी त्याला खूप आधीपासून ओळखत होतो. आम्ही त्यावेळी मालिकामध्ये काम करत होतो आणि आमच्या मालिकांचे सेट जवळ-जवळ होते. आम्ही अनेकदा एकत्र बसून तासंतास गप्पा मारायचो. तो फक्त एक चांगला अभिनेताच नाही तर चांगला माणूसही होता.”
आणखी वाचा- ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांबाबत सुरु असलेल्या वादांवर शरद केळकरने सोडले मौन; म्हणाला…
दरम्यान शरद केळकर आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसला आहे. ‘बाहुबली’ चित्रपटात प्रभासच्या व्यक्तिरेखेला आवाज दिल्यानंतर शरद केळकर बराच चर्चेत आला होता. त्याने ‘कोड नेम तिरंगा’, ‘ऑपरेशन रोमियो’, ‘लक्ष्मी’ आणि ‘भुज’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि त्यातील त्याच्या अभिनयाचं बरंच कौतुक झालं होतं.