गेल्या वर्षभरापासून बॉलिवूड चित्रपट फारसे चालत नाहीयेत. ठराविक चित्रपट सोडले तर अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. आमिर खानपासून ते अक्षय कुमारसारख्या बड्या अभिनेत्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. एकीकडे दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहेत तर बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. बॉलिवूडच्या चित्रपटांविषयी शार्क टॅंक फेम अश्नीर ग्रोव्हरने भाष्य केलं आहे.
‘शार्क टँक इंडिया’ कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहे. ‘शार्क टँक इंडिया’चं दुसरं पर्व सुरू झालं आहे. यंदाच्या पर्वात भारत पेचा माजी सह-संस्थापक आणि उद्योजक अश्नीर ग्रोव्हर शार्क म्हणून सहभागी झालेला नाही. अश्नीरला ‘शार्क टँक इंडिया’च्या पहिल्या पर्वामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. नुकताच तो गाझियाबादमधील कार्यक्रमात सहभागी झाला असताना असं म्हणाला, आजच्या जगात जगात तुमच्याकडे संधी आहे की तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवू शकता. पहिले कसं होतं यशराजजींकडे कॅमेरा आहे.
तो पुढे म्हणाला “यशराजची कलाकारांची निवड करणार, त्यांच्या कॅमेऱ्यासमोर आले की तुम्ही हिरो बनणार. आज सगळ्यांकडे कॅमेरा आहे. तर आता यशराज यांची गरज कशाला? अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. कोणालाच चित्रपटगृहात जायचे नाही. चित्रपटगृह भरणं कठीण बसलं आहे. सगळेजण हे म्हणतात मी घरी बसून, ऑफिसमध्ये, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी माझं मनोरंजन करेन. आपण आता अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे प्रसिद्ध होण्यासाठी सगळयांना संधी आहेत. आपल्याला फक्त त्या संधीचा ब्रँड बनवता आला पाहिजे. अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
अश्नीर ग्रोव्हर मूळचा दिल्लीचा असून त्याने दिल्ली आयआयटीमधून सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये शिक्षण घेतलं आहे. सुरवातीला त्याने नोकरीसुद्धा केली आहे मात्र नंतर तो व्यवसायात शिरला. ‘भारतपे’ चा तो सहसंस्थापक आहे.