‘शार्क टँक इंडिया’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या भागातील सर्वात प्रसिद्ध जजपैकी एक असलेला आणि ‘भारत पे’चा माजी संस्थापक अश्नीर ग्रोव्हर दुसऱ्या पर्वात दिसणार नसल्याचं त्याने सांगितलं होतं. दरम्यान, आता तो एका नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अश्नीर टीव्हीएफच्या ‘पिचर्स’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या दुसऱ्या पर्वाचा भाग असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लोकप्रिय बिझनेस रिअॅलिटी शो ‘शार्क टँक इंडिया’च्या पहिल्या सीझननंतर अश्नीर ग्रोव्हरच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. त्याचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स देखील खूप वाढले होते. पहिल्या पर्वाच्या यशानंतर दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा अश्नीरदेखील दुसऱ्या पर्वाचा भाग असेल, असं चाहत्यांना वाटत होतं. पण आपण दुसऱ्या पर्वात दिसणार नसल्याचं अश्नीरने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता आपण टीव्हीएफ ‘पिचर्स’ या लोकप्रिय सीरिजच्या दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं ग्रोव्हरने सांगितलं आहे.
“आलियाच्या ‘गंगूबाई…’ चित्रपटाच्या यशाचं श्रेय…”; विद्या बालनने संजय लीला भन्साळींवर ओढले ताशेरे
अश्नीर ग्रोव्हर टीव्हीएफ ‘पिचर्स’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. त्याच्या सीरिजचा प्रोमो व्हिडीओही प्रदर्शित झाला आहे. अश्नीर ग्रोव्हरने त्याच्या ट्विटर हँडलवर या सीरिजच्या ट्रेलरचा व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. त्याची ‘TVF Pitchers’ ही सीरिज २३ डिसेंबरपासून Zee5 वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
कतरिनाशी लग्नाचा निर्णय घेतल्यावर पालकांची प्रतिक्रिया काय होती? विकी म्हणाला, “माझे आई-बाबा…”
‘पिचर्स’च्या ट्रेलरची सुरुवात लिफ्टपासून होते. त्यात सीरिजमधील मुख्य पात्र एका खराब प्रेझेंटेशनबद्दल चर्चा करत असतात आणि एकमेकांवर राग काढतात. त्यानंतर तिघेही अश्नीर ग्रोव्हरसोबतची मीटिंग मिस झाल्याबद्दल बोलतात. आमची कंपनीही या लिफ्टप्रमाणेच खाली जात आहे, असं ते बोलत असतात. तेव्हा लिफ्ट खालच्या मजल्यावर थांबते, लिफ्टमधील गर्दी कमी होताच अश्नीर ग्रोव्हर त्या तिघांच्या मागे उभा राहतो. अश्नीरला पाहून तिघेही चकित होतात. तेव्हा अश्नीर ग्रोव्हर त्याला म्हणतो, “भाऊ तू काय करतोयस? मी टॅलेंट ओळखतो. जब तक है ग्रोव्हर, इट्स नॉट ओवर,” असं त्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलंय.
या वेब सीरिजमध्ये अश्नीर ग्रोवरसह नवीन कस्तुरिया, अभय महाजन, अरुणब कुमार, अभिषेक बॅनर्जी आणि रिद्धी डोगरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.