‘३ इडियट्स’चा सिक्वेल नक्की कधी येईल, याच्या सिक्वेलचं काम सुरू आहे का? याबद्दल अभिनेता शर्मन जोशीला सतत विचारलं जातंय. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील स्टारकास्ट आमिर खान, आर माधवन व शर्मन एका व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते, त्यानंतर सिक्वेलची चर्चा सुरू झाली होती. चाहत्यांना या तिघांनाही पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायचं आहे. आता सिक्वेलबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर शर्मननेच उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

72 Hoorain: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला चित्रपट, कमावले फक्त ‘इतके’ लाख रुपये

‘इंडिया टुडे’शी बोलताना शर्मन म्हणाला, “आम्ही अनेकदा आपल्या आयडिया शेअर केल्या आहेत, पण त्यानंतर चर्चा फार पुढे गेली नाही. तुम्हा सर्वांना माहिती आहेच की, राजकुमार हिरानी यांच्याकडे चांगले सिक्वेल बनवण्याची क्षमता आहे, पण ते कथा, दर्जा आणि मानकांच्या बाबतीत कोणत्याही स्तरावर तडजोड करत नाहीत. म्हणून आम्ही सर्वजण आशा करतोय की या चित्रपटाचा सिक्वेल ते नक्की बनवतील.”

“बाळासाहेबांचं ते स्वप्न अपूर्णच”, नितीन गडकरींचा खुलासा; म्हणाले, “त्यांच्या निधनाआधी मी रुग्णालयात भेटल्यावर…”

आमिर, शर्मन व आर माधवन यांचा एक व्हिडीओ आला होता, त्याबद्दल शर्मन म्हणाला, “असे अनेक चाहते होते ज्यांना वाटलं की आम्ही तिघे सिक्वेलसाठी एकत्र आलोय. पण जेव्हा त्यांना कळलं की ही जाहिरात आहे, तेव्हा त्यांची निराशा झाली होती. इतकंच नाही तर चाहत्यांकडून आम्हाला तशा प्रतिक्रियाही आल्या. खूप दिवसांनी एकत्र येणं खरंच खूप रोमांचक होतं.”

“मी आईला घाबरून होतो”, दत्तू मोरेचा प्रेम विवाहाबद्दल खुलासा; म्हणाला, “स्वातीच्या बाबांची भेट घेतली अन्…”

दरम्यान, शर्मन सध्या त्याच्या ‘कफस’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. यामध्ये मोना सिंगची महत्त्वाची भूमिका आहे. ही सीरिज २३ जून रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली. साहिल सांघाने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.