सैफ अली खानने फक्त २१ वर्षांचा असताना अभिनेत्री अमृता सिंहशी लग्न केलं होतं. अमृता त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठी होती. सैफने अमृताशी लग्नाबद्दल कुटुंबियांना सांगितलं नव्हतं, लग्न केल्यानंतर त्याने याबाबत घरी सांगितलं. ‘कॉफी विथ करण’च्या ताज्या भागात सैफ आणि त्याची आई ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली. सैफने अमृताशी लग्नाची माहिती कुटुंबाला कशी दिली होती, ती आठवण शर्मिला टागोर यांनी सांगितली.

शर्मिला यांनी सांगितलं की जेव्हा सैफ त्यांना भेटायला आला तेव्हा त्या मुंबईत होत्या आणि तेव्हाच त्याने लग्नाची बातमी दिली. शर्मिला म्हणाला, “सैफ म्हणाला, ‘मला तुला काही तरी सांगायचं आहे’ आणि मग त्याने मला लग्न केल्याचं सांगितलं. मी काय करत होते माहीत नाही, पण मी शांत होते आणि तो म्हणाला, ‘अम्मा, तुझा रंग बदलत आहे, तू वेगळी दिसत आहेस.’ मी म्हणाले, ‘ठीक आहे, आपण याबद्दल नंतर बोलू, आत्ता नाही’. तो गेल्यावर मी टायगरला फोन करून सांगितलं. तोही बराच काळ शांत होता. आम्ही ती गोष्ट तिथेच सोडली आणि मग मी म्हणाले की ‘मला तिला भेटायला आवडेल.'”

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने लोणावळ्यात बांधली लग्नगाठ, फोटो पाहिलेत का?

सैफ तेव्हाची आठवण सांगत म्हणाला, “माझ्या लग्नानंतर आईने मला साथ दिली होती. ती मला म्हणाली होती, ‘मला विश्वास आहे की तू कुणासोबत तरी राहतोस आणि तू काही गोष्टी करत आहेस’. मी हो म्हणालो आणि ती म्हणाली, ‘लग्न करू नकोस’ आणि मी म्हणालो, ‘माझं काल लग्न झालं’, आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ती रडू लागली आणि मला वाटलं की मी तिला खूप दुखावलं आहे. मग ती म्हणाली, ‘तू मला खरंच दुखावलंस, तू मला का सांगितलं नाहीस?’ असं त्यावेळी घडलं होतं.”

Video: ५८ वर्षीय अभिनेत्याने दुसऱ्यांदा केलं लग्न, आईसह त्याचा १६ वर्षांचा मुलगाही होता उपस्थित

शर्मिला म्हणाल्या की सैफ आणि अमृताचे लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या अमृताला भेटल्या होत्या. “आम्ही चहा किंवा काहीतरी घेतलं होतं, आम्ही गप्पा मारल्या, मला ती आवडली, पण तरीही मला त्यांच्या लग्नाचा खूप धक्का मोठा बसला होता,” असं त्यांनी सांगितलं. करणने जेव्हा सैफला इतक्या लहान वयात लग्न कशामुळे केले असं विचारलं तेव्हा सैफ म्हणाला की हे घरातून पळून जाण्यासारखं होतं. “मला त्यावेळी वाटलं होतं की ही एक प्रकारची सुरक्षितता होती. तेव्हा मला ते सगळं खूप छान वाटत होतं आणि मला वाटलं की लग्न करून मी स्वतःचं एक घर बनवू शकेन.”

‘या’ अभिनेत्रीने करिअरमध्ये केले फक्त ७ सिनेमे; सुपरस्टारशी लग्न, मुलीचा जन्म अन् ९ वर्षांनी घेतलेला जगाचा निरोप

शर्मिला यांनी सैफ आणि अमृता सारख्या स्वभावाचे होते असं म्हटलं. तसेच लग्न केलं तेव्हा ते एकत्र खूप आनंदी दिसत होते असंही नमूद केलं. पण दुर्दैवाने १३ वर्षांनी ते विभक्त झाले. “दुर्दैवाने २० व्या वर्षी लग्न केलं तेव्हा मी खूप तरुण होतो. लग्नानंतर गोष्टी बदलतात. ती माझ्याशी खूप छान वागायची. ती माझ्या दोन मुलांची आई आहे. माझे तिच्याशी चांगले संबंध आहेत आणि मी तिचा खूप आदर करतो,” असं सैफ अमृताबद्दल म्हणाला.

सैफ आणि अमृता सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांचे पालक आहेत. सैफने नंतर करीना कपूरशी लग्न केलं आहे आणि त्यांना तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तर अमृताने पुन्हा लग्न केलं नाही. सारा व इब्राहिम अमृताबरोबर राहतात.

Story img Loader