एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर आता ‘गुलमोहर’ या चित्रपटातून पुन्हा एकादा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. येत्या ३ मार्चला शर्मिला टागोर यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शर्मिला यांनी मनोज बायपेयीच्या आईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबाबत त्या खूपच उत्साही आहेत. शर्मिला यांनी सांगितलं की हा चित्रपट त्यांनी आतापर्यंत ३ वेळा पाहिला आणि तो पाहून त्या खूप रडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२७ फेब्रुवारीला दिल्ली येथे झालेल्या ‘गुलमोहर’च्या स्क्रिनिंगच्या वेळी शर्मिला टागोर यांनी हा खुलासा केला. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. ज्यात त्या सर्व प्रेक्षक आणि चाहत्यांचे त्यांनी दिलेल्या प्रेमासाठी आभार मानताना दिसत आहेत. तसेच चित्रपट पाहण्याचं आवाहन करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- “पुरुषांसाठी नेहमीच…”, बॉलिवूडबाबत शर्मिला टागोर यांचं मोठं विधान, अमिताभ बच्चन यांचाही केला उल्लेख

या व्हिडीओमध्ये शर्मिला टागोर म्हणतात, “तुम्हा सर्वांचे आभार. आशा करते की तुम्हा सर्वांना हा चित्रपट आवडेल. मी हा चित्रपट तिसऱ्यांदा पाहिला. मी या चित्रपटात काम केलं आहे तरीही मला चित्रपट पाहिल्यानंतर खूप रडू आलं. मनोज बाजपेयी आणि सूरज शर्मा या कलाकारांबरोबर काम केल्यानंतर तुम्हालाही रडू येईल. पण मला या तरुण पिढीबरोबर काम करायला आवडतं. ते स्वतःसाठी काही गोष्टी कठीण करून ठेवतात. ते खूप सहजपणे आपल्या वडिलांकडून पैसे घेऊन आयुष्यात पुढे जाऊ शकतात. पण त्यांना स्वतःला शिक्षा द्यायची असते. स्वतःला संकटात टाकायचं असतं.”

आणखी वाचा- “मी रात्री अभिनेत्यांच्या रुममध्ये…”, बॉलिवूडबद्दल कंगना रणौतचं ट्वीट चर्चेत

दरम्यान ‘गुलमोहर’ एक कौटुंबिक चित्रपट आहे. ज्याची कथा बत्रा कुटुंबाभोवती फिरते. पण समस्या तेव्हा येते जेव्हा हे कुटुंब त्यांचं ३४ वर्षं जुनं घर सोडून दुसरीकडे कुठेतरी जाण्याची तयारी करतं. ‘गुलमोहर’मधून शर्मिला टागोर १२ वर्षांनी अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहेत. हा चित्रपट ३ मार्चला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल चित्तेला यांनी केलं आहे. तर या चित्रपटात अमोल पालेकर, मनोज बाजपेयी, सिमरन आणि कावेरी सेठ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharmila tagore cry after watching her own film gulmohar for third time mrj