अभिनेत्री शर्मिला टागोर या गेली ६५ वर्षे सिनेसृष्टीत काम करीत आहेत. त्यांनी ‘कश्मीर की कली’, ‘आराधना’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांतून काम केले आहे. शर्मिला टागोर यांनी या ६५ वर्षांत अनेक लक्षवेधी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीत आताचे बॉलीवूड स्टार्स आणि त्यांच्या वाढत्या मानधनाबाबत वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘स्क्रीन लाइव्ह’ कार्यक्रमात बोलताना बॉलीवूड स्टार्सचे वाढते मानधन आणि व्हॅनिटी व्हॅन्सवर मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा… Video : “मराठीतील तीन सर्वात छान शब्द कोणते?”, चाहत्याच्या प्रश्नाला मृणाल ठाकूरने दिलं उत्तर; म्हणाली…

शर्मिला टागोर म्हणाल्या, “मी कलाकारांच्या मानधनाबाबत चिंतेत आहे. काही कलाकार केवळ खूप पैसे घेत नाहीत तर स्वतःबरोबर स्वयंपाकी, आणि मोठा ताफाही घेऊन प्रवास करतात. मी एका जाहिरातीसाठी शूट करत होते, तेव्हा माझा मेकअप करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, आजकाल काही स्टार्समध्ये त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन्सच्या आकारावरून स्पर्धा असते.”

शर्मिला टागोर पुढे म्हणाल्या, “पूर्वी व्हॅनिटी व्हॅन्स फक्त खासगी वेळ घालवण्यासाठी आणि कपडे बदलण्याच्या सोयीसाठी असायच्या. आता त्यामध्ये मीटिंग रूम, आराम करण्यासाठी स्वतंत्र जागा सगळं आहे. हे सगळं कलाकारांना त्यांच्या मूळ कामापासून म्हणजेच अभिनयापासून दूर नेत आहे. पैसे कमावणं महत्त्वाचं आहे, पण जर तुम्ही वास्तवापासून दूर जात असाल, तर प्रेक्षकांमध्ये काय चालतंय? त्यांना काय आवडतंय? हे कसं कळेल?”

हेही वाचा… घराचं नाव ‘रामायण’, पण लेकीला त्याविषयी पुरेशी माहितीच नाही; मुकेश खन्नांनी शत्रुघ्न सिन्हांवर केली टीका, म्हणाले, “त्यांनी तिला…”

शर्मिला टागोर यांनी ‘आराधना,’ ‘कश्मीर की कली,’ आणि ‘अमर प्रेम’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनांवर राज्य केले आहे. शर्मिला यांचा विवाह क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याबरोबर झाला. त्यांना सैफ अली खान, सोहा अली खान व सबा अली खान ही तीन मुले आहेत.

हेही वाचा… “…म्हणून मला बॉलीवूड पार्ट्यांमध्ये बोलवत नाहीत”, अभिनेते मनोज बाजपेयींचा खुलासा; म्हणाले, “त्यांना वाटतं…”

शर्मिला टागोर गेल्या वर्षी आलेल्या ‘गुलमोहर’ या चित्रपटात दिसल्या होत्या. राहुल व्ही. चिटेला दिग्दर्शित या चित्रपटात मनोज वाजपेयी आणि सूरज शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शर्मिला टागोर लवकरच ‘आउटहाऊस’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुनील सुकथनकर दिग्दर्शित या चित्रपटात मोहन आगाशे, सोनाली कुलकर्णी, नीरज काबी व सुनील अभ्यंकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Story img Loader