सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी आपल्या संपत्तीबाबत माहिती दिली आहे. लहान वयातच पैसे कमवायला सुरुवात करणाऱ्या शर्मिला यांनी सांगितलं की त्यांनी जेवढी संपत्ती खरेदी केली ती कुठे आहे याची माहिती दिवंगत पती मन्सूर अली खान (टायगर) पतौडी यांना होती. पण स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली सर्व मालमत्ता माझ्या नावावर आहे, असं त्या म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण विकत घेतलेली कोणतीच संपत्ती पतीच्या नावावर नाही, सर्व स्वतःच्याच नावाने घेतल्याचा खुलासा एका मुलाखतीत शर्मिला यांनी केला. “मी जे काही विकत घेतलं, माझी संपत्ती जसं की घर, कार किंवा कोणतीही वस्तू, दागिने…ते सगळं आधीपासूनच माझ्या नावावर आहे. मी ते पतीबरोबर शेअर केलं नाही, माझी संपत्ती माझ्या पतीच्या नावाने नाही. तसेच टायगरने जे काही घेतलं ते त्याच्या नावावर आहे आणि त्याबद्दल त्याने मृत्यूपत्र बनवून ठेवलेलं आहे,” असं त्या म्हणाल्या.

प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न

इस्लाममध्ये मृत्यूपत्र बनवण्याची परवानगी नाही, असा दावा शर्मिला टागोर यांनी केला. “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची परवानगी नाही, पण आम्हाला असं करावं लागलं. इस्लामनुसार, तुम्ही तुमची संपत्ती दुसऱ्यांना देऊ शकता, पण तुमच्या वारसांना देऊ शकत नाही. संपत्तीचा २५%, ५०% वाटा असं काहीतरी आहे, त्यामुळे ते समजून घेणं गरजेचं होतं. आमच्याकडे खूप जमीन आहे, त्यामुळे ती कोणाच्या नावावर करायची, याचा विचार करणंही आवश्यक होतं. मला तीन मुलं आहेत. त्यामुळे सर्व काही नियमानुसार करावं लागेल,” असं त्या म्हणाल्या.

पुनर्विवाह! पहिल्या लग्नात दोघांनाही अपयश, अभिनेत्रीने ४३ वर्षीय अभिनेत्याशी केलं दुसरं लग्न; शाही सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी

शर्मिला व टायगर पतौडी यांना मुलगा सैफ व दोन मुली सोहा आणि सबा आहेत. शर्मिला यांनी वयाच्या १६-१७ व्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली, पण त्यांना कधीच पैसे किंवा संपत्तीचं व्यवस्थापन करण्यात रस नव्हता, मात्र करोनाच्या साथीनंतर आपण यात स्वतः लक्ष घातलं, असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharmila tagore says she bought houses cars on own name never shared assets with husband tiger pataudi hrc