करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण 8’ खूप चर्चेत आहे. या शोच्या ताज्या भागात सैफ अली खान आणि शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली. यादरम्यान या मायलेकाने त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक मनोरंजक खुलासे केले. यावेळी शर्मिला टागोर यांच्या बिकिनी वादावरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

करण शर्मिला टागोर यांना म्हणाला, “मी तुमच्या प्रसिद्ध बिकिनी फोटोशूटबद्दल बोलत आहे, जो ६० च्या दशकात फिल्मफेअरच्या कव्हरसाठी शूट केला गेला होता. त्यावेळी असे फोटोशूट करण्याचे धाडस कोणाचेच होत नव्हते. मी असं ऐकलंय की तुम्ही अशी पोज द्यावी अशी कोणाचीच इच्छा नव्हती. तुमचे फोटो काढताना फोटोग्राफरही खूप अस्वस्थ झाला होता का?” यावर सैफने त्याची आठवण सांगितली. “मला ते दिवस लक्षात आहेत. तेव्हा मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो आणि माझे मित्र मला आईचे फोटो दाखवून विचारायचे, ‘ही तुझी आई आहे का?'”

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

सैफ अली खानने १२ वर्षांनी मोठ्या अमृता सिंहशी गुपचूप केलेलं लग्न; आई शर्मिला टागोर यांना कळताच…

सैफ अली खानचं बोलून झाल्यानंतर त्याची आई आणि त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर म्हणाल्या, “ते फोटो काढताना फोटोग्राफर थोडे अस्वस्थ झाले होते. पण फोटोशूट दरम्यान मी चांगली दिसत आहे, इतकाच विचार मी करत होते. पण लोकांनी माझ्या त्या फोटोशूटचा चुकीचा अर्थ लावला होता याचं वाईट वाटतं.”

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने लोणावळ्यात बांधली लग्नगाठ, फोटो पाहिलेत का?

एका फोनमुळे लंडनहून यावं लागलं होतं परत

शर्मिला टागोर पुढे म्हणाल्या, “फक्त माझा फोटो पाहून लोकांनी ट्रोल केलं होतं. या फोटोशूटद्वारे मला लोकांचे लक्ष वेधून घ्यायचं होतं, असं लोकांना वाटत होतं. पण, मी या सगळ्याचा विचार केला नव्हता. मला वाटलं होतं की मी बिकिनीमध्ये छान दिसेन. जेव्हा माझा हा फोटो फिल्मफेअरमध्ये आला तेव्हा मी लंडनमध्ये शूटिंग करत होते. मला निर्माता शक्ती सामंता यांचा फोन आला होता आणि त्यांनी मला परत येण्यास सांगितलं होतं जेणेकरून मी लोकांशी या फोटोबाबत बोलू शकेल.”

Video: ५८ वर्षीय अभिनेत्याने दुसऱ्यांदा केलं लग्न, आईसह त्याचा १६ वर्षांचा मुलगाही होता उपस्थित

बिकिनीमुळे संसदेत झालेल्या गदारोळाबद्दल शर्मिला म्हणतात…

जुन्या आठवणींना उजाळा देताना शर्मिला टागोर म्हणाल्या, “निर्माते शक्ती म्हणाले होते की जर मला लोकांमध्ये राहायचं असेल तर मी असं वागू शकत नाही (बिकिनीत फोटो काढू शकत नाही). तेव्हा त्यांच्या बोलण्याने मी नाराज झाले होते. मला त्या काळी ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. इतकंच नाही तर या फोटोबाबत संसदेतही प्रश्न विचारण्यात आले होते. मग माझा फोटो मी टायगरला (शर्मिलांचे पती टायगर पतौडी) टेलिग्रामद्वारे पाठवला आणि विचारलं की मी चांगली दिसत आहे का? यानंतर मी शांत झाले.” या घटनेनंतर मी लोकांसमोर कसं वागायला हवं, याची काळजी घेऊ लागले, असंही त्यांनी नमूद केलं.

Story img Loader