निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. जिथे केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटलं आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही ही आमची केरळ स्टोरी नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता थरूर यांनी चित्रपटाबाबत आणखी एक ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ही तुमच्या…”, काँग्रेस नेते शशी थरूर यांची वादात अडकलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटात असा दावा करण्यात आला आहे की केरळमधील ३२,००० हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना बळजबरीने धर्मांतरित करून ISIS या दहशतवादी संघटनेमध्ये सामील होण्यासाठी देशाबाहेर पाठवण्यात आले. या चित्रपटाच्या कथेवरून वाद दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेससह इतर पक्ष या चित्रपटाला विरोध करत असून हा अजेंडा असल्याचे सांगत आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही याबाबत ट्वीट केले आहे.

“तुझं आयुष्य फक्त पार्टी आणि मुली…’, जिया खानने सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीबद्दल केलेले खुलासे; म्हणालेली, “मला गरोदर…”

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, “केरळमधील ३२,००० महिलांच्या कथित धर्मांतराचा प्रचार करणाऱ्यांसाठी हा दावा सिद्ध करण्याची आणि काही पैसे कमावण्याची ही संधी आहे. ते आव्हान स्वीकारण्यास तयार होतील की त्यांत्याकडे कोणतेही पुरावे नाहीत कारण मुळात कोणतेही पुरावे अस्तित्वातच नाहीत?.” याबरोबरच थरूर यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. ज्यामध्ये ‘केरळमधील ३२००० महिलांनी इस्लाम स्वीकारला, हा दावा सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करा आणि एक कोटी रुपये न्या’ असं लिहिलं आहे. ‘नॉट अ केरळ स्टोरी’ असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. त्यांच्या या पोस्टनुसार, ज्यांना आव्हान स्वीकारून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळवायचे आहे, ते ४ मे रोजी केरळमधील प्रत्येक जिल्ह्यातील काउंटरवर पुरावे सादर करू शकतात.

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सुदीप्तो सेन यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट केरळमधील सुमारे ३२००० बेपत्ता महिलांची कथा आहे, ज्यांचं धर्मांतर करण्यात आलं, त्यांना कट्टरपंथी बनवलं गेलं आणि भारत व जगभरातील दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा वापर करण्यात आला. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashi tharoor challenge ask to give proof the kerala story and win one crore hrc
Show comments