अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा याने इंडियन एक्सप्रेस.कॉमला याबाबत पुष्टी दिली होती. आता शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल स्वत: माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “ही एक नियमित तपासणी होती, काळजी करण्याची काहीच गरज नाही. मला वाटतं की गेल्या काही आठवड्यात अनेक गोष्टी घडल्याने आणि त्यातील उत्साहामुळे थोडा थकलो होतो. पण आता मी ठीक आहे आणि विश्रांती घेतोय.”
हेही वाचा… शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल, मुलगा लव सिन्हा म्हणाला, “गेल्या काही दिवसांपासून…”
शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या मुलीचा म्हणजेच सोनाक्षीचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे. सोनाक्षीबद्दल सांगताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “निर्माता म्हणून तिला बॉलीवूड इंडस्ट्रीत लॉन्च करण्यासाठी तिने मला कधीच विचारलं नाही. माझं नाव आणि प्रसिद्धी वापरून तिने कधीही चित्रपटांत भूमिका मिळवल्या नाहीत. हे सगळं तिने स्वत:च्या हिमतीवर केलंय. लोकं नेपोटिझमबद्दल बोलतात. पण या इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे अयशस्वी झाले आहेत. अगदी माझ्याप्रमाणेच माझ्या मुलीने या इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलंय. फरक फक्त हाच आहे की तेव्हा माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. पण तिच्याकडे होता, तिला माझी मदत सहज घेता आली असती, पण तिने ती घेतली नाही.”
हेही वाचा… “बाबाला सोडून नको जाऊस…”, ‘ठरलं तर मग’ फेम केतकी पालवने सांगितला लेकीचा मजेशीर किस्सा, म्हणाली…
जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आलं की ते आणि सोनाक्षी एकत्र स्क्रिनवर कधी दिसणार? यावर शत्रुघ्न सिन्हा हसले आणि म्हणाले की, “मला थोडं ते विचित्र वाटतं. माझ्यात आणि तिच्यात तुलना झालेली मला आवडणार नाही. मला माहित आहे की माझ्यापेक्षा ती जास्त आत्मविश्वासू आणि प्रतिभावान आहे. वडिल आणि अभिनेता या दोघांमध्ये खूप फरक आहे. माझ्या मुलांनी आयुष्यात जे काही साध्य केलं आहे त्याचा मला खूप अभिमान आहे. सोनाक्षीला अगदी लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात यायचं होतं. विक्रमादित्य मोटवाने याच्या ‘लूटेरा’ चित्रपटात सोनाक्षीने अप्रतिम काम केलं आहे. आता तिने संजय लीला भन्साळीच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये काम केलं आणि त्यामुळे तिला मिळणारी प्रशंसा ही अभिमानास्पद आहे. तिने माझ्याबरोबर काम करावं अशी माझीदेखील खूप दिवसांपासून इच्छा आहे.”
हेही वाचा… ‘नखरेवाली’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित, ‘गुलाबी साडी’ गाण्याशी आहे खास कनेक्शन?
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी नुकतीच लग्नबधनात अडकली. २३ जून २०२४ रोजी सोनाक्षीने झहीर इक्बालशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.