ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा (७७) यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा याने या बातमीला दुजोरा दिला आहे.

लव याने इंडियन एक्सप्रेस.कॉमला (indianexpress.com) सांगितलं की, “गेल्या काही दिवसांपासून वडिलांना व्हायरल ताप आणि अशक्तपणा आला होता म्हणून आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा… Virat Kohli T20 Retirement: विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा करताच बॉलीवूडमधून हळहळ व्यक्त; रणवीर सिंगसह ‘या’ कलाकारांच्या सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा

नुकतंच शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षीचं झहीर इक्बालशी नोंदणी पद्धतीने लग्न झालं. २३ जून रोजी विशेष विवाह कायद्यानुसार सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी अभिनेत्रीच्या घरी विवाह केला. त्यानंतर मुंबईमध्ये रिसेप्शनचं आयोजन करीत बॉलीवूडमधल्या अनेक कलाकारांना या कपलने आमंत्रित केलं होतं. लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीर त्यांच्या कुटुंबीयांबरोबर डिनरसाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. यादरम्यानचे या कपलचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता अचानक शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रकृतीची ही बातमी समोर आली आहे.

हेही वाचा… “नका करत जाऊ…”, ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांच्या ‘या’ व्हिडीओवर नेटकऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला…

त्यानंतर एकदा या नवदाम्पत्याची गाडी रुग्णालयाबाहेर दिसली होती. तेव्हापासूनच शत्रुघ्न सिन्हा यांची प्रकृती खालावल्याचं आता म्हटलं जातंय.

हेही वाचा… …आणि म्हणून अमिताभ बच्चन यांनी टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहिला नाही, म्हणाले, “मी जेव्हा…”

गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा सुरू होती. यादरम्यान, तिचे वडिल शत्रुघ्न सिन्हा यांचा तिच्या लग्नाला विरोध आहे असं म्हटलं जात होतं. तर लग्नाआधी शत्रुघ्न सिन्हा यांना लेकीच्या लग्नाबद्दल विचारलं असता त्यांनी “आजकालची मुलं आईवडिलांना विचारत नाहीत तर सांगतात” असं विधान केलं होते आणि ते चर्चेत होतं. परंतु, सोनाक्षीच्या लग्नाच्या वेळेस शत्रुघ्न सिन्हा आनंदी दिसत होते आणि ते सिन्हा परिवारासह आपल्या लेकीच्या लग्नात सहभागी झाले होते.

हेही वाचा… T-20 Worldcup: “दिल जीत लिया…”, सलमान खान, रणवीर सिंग ते विकी कौशल; ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी केलं भारतीय संघाचं कौतुक, भावुक होत म्हणाले…

दरम्यान, लग्नाआधी शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यग्र होते. पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा ५९,५६४ मतांनी विजयी झाले.