अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रविवारी (२३ जून रोजी) तिचा बॉयफ्रेंड व अभिनेता झहीर इक्बालशी लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या काही सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. तसेच लाडक्या लेकीच्या लग्नानिमित्त शत्रुघ्न सिन्हा यांचं ‘रामायणा’ घर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं आहे. त्यांच्या घराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबईतील बंगल्याचं नाव ‘रामायणा’ आहे. सोनाक्षीचं २३ जूनला लग्न आहे, त्यानिमित्ताने या घरी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पापाराझी अकाउंट्सवरून शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंगल्याचे काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. सजावटीनंतर हा बंगला आणखी सुंदर दिसत आहे.

दरम्यान, दुसरीकडे सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचा मेहंदी सोहळा पार पडला. त्यांच्या मेहंदी सोहळ्यातील काही फोटो चर्चेत आहेत. मेहंदी सोहळ्यासाठी सोनाक्षीने लाल रंगाचा प्रिंटेड ड्रेस निवडला, तर झहीरने फ्लॉवर प्रिंटेड लाल व पांढरा कुर्ता घातला होता. या सर्वांचा त्यांच्या जवळच्या लोकांबरोबरचा एक फोटो व्हायरल होत आहे. झहीरच्या कुटुंबातील एका सदस्याने हा फोटो शेअर केला आहे.

Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांच्या लग्नासाठी दोन्ही कुटुंबीय खूप उत्सुक आहेत. गुरुवारी संध्याकाळी सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय एकमेकांना भेटले. शत्रुघ्न सिन्हांनी सोनाक्षीच्या लग्नापूर्वी पहिल्यांदाच होणारा जावई झहीर इक्बालबरोबर पोज दिल्या. शत्रुघ्न आणि झहीर या दोघांनीही पापाराझींसमोर मिठी मारली. यावेळी शत्रुघ्न सिन्हा खूप आनंदी दिसत होते.

Video: खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी-झहीरची लग्नाआधी घेतली भेट, होणाऱ्या जावयाला सर्वांसमोर मिठी मारली अन्…

सोनाक्षीचं लग्न कुठे होणार?

सोनाक्षी व झहीरच्या लग्नाची पत्रिका ‘अफवा खऱ्या आहेत’ अशा आशयाने डिझाइन करण्यात आली आहे. या लग्नात सर्व पाहुण्यांना फेस्टिव्ह व फॉर्मल ड्रेस कोडमध्ये लग्नात येण्यास सांगितलं आहे. या दोघांच्या लग्नाचा सोहळा मुंबईतील बास्टियन इथे रात्री ८ वाजतापासून सुरू होईल. दोघांच्या लग्नाला बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटी, तसेच ‘हीरामंडी’ वेब सीरिजची संपूर्ण टीम उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या

सोनाक्षीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया

शत्रुघ्न सिन्हांनी गुरुवारी लेकीच्या लग्नाबद्दल नाराज असल्याच्या अफवांवर मौन सोडलं. “मी माझ्या राजकीय कामांमुळे दिल्लीत होतो, पण मी आता मुंबईत आहे. यावरून हेच दिसून येतं की मी फक्त तिचा आधारस्तंभ नाही तर तिचा कवच आहे. सोनाक्षी व झहीरला एकत्र संसार करायचा आहे आणि ते दोघे सोबत खूप छान दिसतात,” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinha house ramayana lighten up amid sonakshi sinha zaheer iqbal mehendi photos viral hrc