अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व अभिनेता झहीर इक्बाल रविवारी २३ जून रोजी लग्न करणार आहेत. मुंबईत दोघांचं लग्न होणार असून त्यासंदर्भातील तयारी सुरू आहे. अशातच आता झहीर सोनाक्षीच्या कुटुंबाबरोबर दिसला. रविवारी सोनाक्षी झहीरच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताने फोटो समोर आले होते, त्यानंतर आता झहीर व सोनाक्षीच्या कुटुंबाचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनाक्षीने लग्नाबद्दल आधीच न सांगितल्यामुळे तिचे वडील, दिग्गज अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याच्या अफवा होत्या. त्याबद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी शत्रुघ्न लग्नाच्या आधी झहीर इक्बालबरोबर पहिल्यांदाच दिसले. दोघांनी हसत हसत कॉम्प्लेक्सच्या बाहेर पापाराझींना पोज दिल्या.

सोनाक्षी सिन्हाने लग्नाआधी झहीर इक्बालच्या कुटुंबासह घालवला वेळ, होणाऱ्या नणंदेने शेअर केला Family Photo

गुरुवारी संध्याकाळी अनेक पापाराझींनी इन्स्टाग्राम अकाउंट्सवर झहीरचे सिन्हा कुटुंबाबरोबरचे व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये सोनाक्षी, तिचे आई-वडील व झहीर एकत्र दिसत आहेत. तर, शत्रुघ्न सिन्हांनी सोनाक्षीच्या लग्नापूर्वी पहिल्यांदाच होणारा जावई झहीर इक्बालबरोबर पोज दिल्या.

शत्रुघ्न आणि झहीर या दोघांनीही पापाराझींसमोर मिठी मारली. यावेळी शत्रुघ्न सिन्हा खूप आनंदी दिसत होते. त्यांना पापाराझींनी थांबून पोज देण्यास सांगितलं असता ते ‘खामोश’ असं म्हणाले. यावेळी सोनाक्षीची आई पूनम सिन्हाही तिथे होत्या.

शत्रुघ्न सिन्हा नाराज, लाडक्या लेकीच्या लग्नाला जाणार नाहीत? अभिनेत्रीचे मामा म्हणाले, “सोनाक्षी आणि तिच्या कुटुंबात…”

सोनाक्षीही यावेळी कुटुंबाला भेटली. तिच्या लग्नाच्या चर्चा होत आहेत, तेव्हापासून ती पहिल्यांदाच पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. ती तिच्या कारमधून उतरली आणि लगेच अपार्टमेंटमध्ये गेली, ती थांबली नाही.

नाराज असल्याच्या चर्चांवर शत्रुघ्न सिन्हांनी दिली प्रतिक्रिया

शत्रुघ्न सिन्हांनी गुरुवारी सकाळी लेकीच्या लग्नाबद्दल नाराज असल्याच्या अफवांवर मौन सोडलं. ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “मला सांगा, हे कोणाचं आयुष्य आहे? हे माझी एकुलती एक मुलगी सोनाक्षीचे आयुष्य आहे, जिचा मला खूप अभिमान आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ती मला तिचा आधारस्तंभ म्हणते. त्यामुळे तिच्या लग्नाला मी नक्कीच जाईन. मी का जाऊ नये? तिचा आनंद हाच माझा आनंद आणि माझा आनंद हाच तिचा आनंद आहे. तिला तिचा जोडीदार आणि तिच्या लग्नाचे इतर सर्व निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांची संपत्ती किती? दोघांपैकी श्रीमंत कोण? जाणून घ्या

“मी माझ्या राजकीय कामांमुळे दिल्लीत होतो, पण मी आता मुंबईत आहे. यावरून हेच दिसून येतं की मी फक्त तिचा आधारस्तंभ नाही तर तिचा कवच आहे. सोनाक्षी व झहीरला एकत्र संसार करायचा आहे आणि ते दोघे सोबत खूप छान दिसतात,” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinha met zaheer iqbal sonakshi sinha ahead of wedding videos viral poonam sinha hrc