बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालशी लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी मुंबईत झहीरशी लग्नगाठ बांधणार असं म्हटलं जात आहे. लेकीच्या लग्नाबद्दल ज्येष्ठ अभिनेते व नवनिर्वाचित खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आलं, त्यावर सोनाक्षीने आपल्याला काहीच सांगितलं नसल्याचं ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी सध्या दिल्लीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मी इथे आलोय. माझं माझ्या मुलीच्या प्लॅन्सबद्दल काहीच बोलणं झालेलं नाही. तर तुमचा प्रश्न आहे, ती लग्न करणार आहे का? उत्तर असं आहे की तिने मला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मी जेवढं माध्यमांमध्ये आलंय तेवढंच वाचलं आहे. जर आणि जेव्हा ती मला आणि माझ्या पत्नीला याबद्दल विश्वासात घेऊन सांगेल, तेव्हा आम्ही जोडप्याला आशीर्वाद देऊ. ती नेहमी आनंदी राहो, याच शुभेच्छा,” असं शत्रुघ्न सिन्हा ‘टाईम्स नाऊ’शी बोलताना म्हणाले.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी करणार लग्न, तारीख ठरली

वरातीसमोर नाचायला आवडेल – शत्रुघ्न सिन्हा

सोनाक्षी स्वतःसाठी योग्यच निर्णय घेईल असा विश्वास असल्याचं त्यांनी नमूद केलं. “आम्हाला आमच्या मुलीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. ती कधीही बेकायदेशीर किंवा चुकीचा निर्णय घेणार नाही. एक सज्ञान म्हणून तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जेव्हा केव्हा माझ्या मुलीचे लग्न होईल तेव्हा मला वरातीसमोर नाचायला आवडेल,” असं ते म्हणाले.

बॉयफ्रेंडपेक्षा वयाने मोठी आहे सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री ३७ वर्षांची तर झहीर इक्बालचं वय…

आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी घेत नाहीत

सोनाक्षीच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्यानंतर खूप जण फोन करत आहेत, पण लग्नाबद्दल मला फार माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं. “माझ्या जवळचे लोक मला लग्नाबद्दल विचारत आहेत की मला या कथित लग्नाबद्दल का माहीत नाही आणि मीडियाला याबद्दल माहीत आहे. यावर मी फक्त इतकंच म्हणू शकतो की आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी घेत नाहीत, तर त्यांना कळवतात. आम्हीही त्याचीच वाट पाहत आहोत,” असं ते म्हणाले.

“माझ्या कुटुंबाला…”, अली फजलशी आंतरधर्मीय लग्न करण्याबाबत पहिल्यांदाच बोलली रिचा चड्ढा

शत्रुघ्न सिन्हा झाले खासदार

माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार, सोनाक्षी आणि झहीर मुंबईत लग्न करणार आहेत. हे दोघेही मागच्या काही काळापासून लग्नाची तयारी करत आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे त्यांनी त्यांचे प्लॅन्स पुढे ढकलले. सोनाक्षीचे वडील, अभिनेते व राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून तृणमुल काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली व ते विजयी झाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinha reaction on sonakshi sinha zaheer iqbal wedding rumors hrc