अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २३ जून २०२४ रोजी अभिनेत्री झहीर इक्बालशी लग्न केलं. सोनाक्षी व झहीरचं आंतरधर्मीय लग्न होतं. ते आधी नोंदणी पद्धतीने लग्नबंधनात अडकले, त्यानंतर मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांचा जंगी रिसेप्शन सोहळा पार पडला. या लग्नाला सोनाक्षी व झहीरच्या कुटुंबियांसह बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. पण सोनाक्षीचा भाऊ या लग्नाला नव्हता, त्याबाबत शत्रुघ्न सिन्हांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोनाक्षी सिन्हा ही दिग्गज बॉलीवूड अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. सोनाक्षीला लव व कुश नावाचे दोन मोठे भाऊ आहेत. सोनाक्षीच्या लग्नाचा तिचे आई-वडील उपस्थित होते, पण तिचे भाऊ नव्हते. काही दिवसांपूर्वीच तिचा भाऊ लव याने सोनाक्षीच्या लग्नाला न जाण्याचं कारण झहीरचे वडील असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता शत्रुघ्न यांनी सोनाक्षीच्या लग्नाला मुलगा लव गैरहजर असण्याबाबत विधान केलं आहे.

Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Salil Ankola Former Indian Cricketer Mother Found Dead in Pune Flat Wound Marks Found on Neck
Salil Ankola: माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, गळ्यांवर जखमांच्या खूणा
Loksatta vyaktivedh Madhura Jasraj Paraphrase of V Shantaram autobiography movie
व्यक्तिवेध: मधुरा जसराज
Property Rights Of Illegitimate Children in India
अवैध विवाहाच्या अपत्यांचा वारसाहक्क
Yograj Singh Shares Incident of His Father Said My Father Killed a Tiger Smeared its blood on my lips and Forehead
Yograj Singh: “माझ्या वडिलांनी वाघाची शिकार करून रक्त माझ्या ओठाला लावलं…”, युवीच्या बाबांनी सांगितला धक्कादायक किस्सा
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
Sitaram Yechury pass away know about his important role in politics
येचुरींच्या जाण्याने आशावादाचा स्रोत गमावला!

Video: अमृता फडणवीस अन् लेक दिविजा सारखाच लूक करून पोहोचल्या अनंत-राधिकाच्या संगीतला, ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

‘टाईम्स नाऊ’शी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी कथित कौटुंबिक वादावर भाष्य केले आणि ते म्हणाले, “आम्ही याहून मोठ्या समस्या पाहिल्या आहेत. त्यासमोर या काहीच नाही आणि काळजी करण्यासारखं देखील काही नाही. लग्नाच्या वेळी आम्ही कोणत्याही एका सामान्य कुटुंबासारखे होतो. पण तरीही लोक आमच्याकडे इतके लक्ष का देत होते? आम्ही इतके अटेंशन मागितले नव्हते.”

गरबा नाईट, शिव पूजा ते सात फेरे! १४ जुलैपर्यंत असतील अनंत-राधिकाच्या लग्नाचे कार्यक्रम, कोणते समारंभ कुठे होणार?

ते पुढे म्हणाले, “अशा प्रकारचे लग्न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. लग्नात आमच्या कुटुंबाचे नाव खराब करण्यासाठी वाईट गोष्टी करण्यात आल्या. माझ्या कुटुंबावर होणारा हल्ला मी सहन करणार नाही, हे मी स्पष्ट सांगू इच्छितो.”

सोनाक्षी-झहीरच्या लग्नात मुलाच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारल्यावर या कौटुंबिक गोष्टी कुटुंबातच राहिल्यास चांगलं होईल, असं त्यांनी म्हटलं. “आम्ही काही मुद्द्यांवर एकमेकांबरोबर सहमत असूच असं नाही आणि त्यावर आमच्यात वाद होऊ शकतात. पण शेवटी आम्ही एक कुटुंब आहोत. आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही”, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी नमूद केलं.

‘टिप टिप बरसा पानी’मध्ये अक्षय कुमारला किस करायला तयार नव्हती रवीना टंडन; कारण ऐकून दिग्दर्शक म्हणाले, “तुझ्या बाबांना…”

दरम्यान, सोनाक्षी व झहीरच्या लग्नाला न जाण्याचं कारण लवने एका पोस्टमधून सांगितलं होतं. झहीरचे वडील इक्बाल रतनसी यांचे एका राजकारण्याशी जवळचे संबंध असून त्याची ईडी चौकशी होणार होती, असं त्याने म्हटलं होतं. तसेच झहीरच्या वडिलांची काळी बाजू कळू नये म्हणून त्यांच्या व्यवसायाबद्दल काही बातम्या जाणीवरपूर्वक पेरण्यात आल्या असंही तो म्हणाला होता.