बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न केलं. सोनाक्षी व झहीर यांनी रविवारी (२३ जून रोजी) मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न करून आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. सोनाक्षी झहीरशी लग्न करणार अशा बातम्या आल्यापासून तिला ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर लोक या आंतरधर्मीय लग्नाबद्दल खूप नकारात्मक टिप्पण्या करत आहेत. या ट्रोलिंगवर आता तिचे वडील, दिग्गज अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी लग्न झाल्यापासून सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालला सोशल मीडियावर घृणास्पद कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. शत्रुघ्न सिन्हा मूळचे बिहारचे आहेत. त्यांच्याच राज्यात सोनाक्षी व झहीरच्या आंतरधर्मीय विवाहाला ‘लव्ह जिहाद’ म्हणत निषेध मोर्चा काढण्यात आला आणि सोनाक्षीने राजधानी पाटण्यात कधीही येऊ नये, असं म्हटलं गेलं. हिंदू शिव भवानी सेना नावाच्या संघटनेने हा निषेध मोर्चा काढला होता. या संघटनेने शत्रुघ्न यांना मुलांची लव व कुश नावं बदलण्यासही सांगितलं. आता या संपूर्ण प्रकरणावर शत्रुघ्न सिन्हा यांनी उत्तर दिलं आहे.

सोनाक्षी सिन्हाने लग्नात नेसली आईची साडी, तर रिसेप्शनच्या लाल बनारसी साडीची किंमत फक्त…

‘टाईम्स नाऊ’शी बोलताना शत्रुघ्न सिन्हा हिंदीतील एका लोकप्रिय वाक्याचा उल्लेख करत म्हणाले, “आनंद बक्षी साहेब यांनी अशा आंदोलनकर्त्यांबद्दल लिहिलं आहे, ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. यात मी आणखी काही ओळी जोडू इच्छितो, ‘कहने वाले अगर बेकर, बेकाम-काज के हो तो कहना ही काम बन जाता है.’ माझ्या मुलीने बेकायदेशीर किंवा असंवैधानिक काहीही केलेलं नाही.” जेव्हा लोक बेरोजगार असतात, तेव्हा आंदोलनं करून इतरांवर टीका करणं हेच त्यांचं काम असतं, असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे.

नवविवाहित सोनाक्षी सिन्हा व तिचा पती झहीर इक्बाल यांचे शिक्षण किती? जाणून घ्या

“लग्न हा दोन व्यक्तींमधील अत्यंत वैयक्तिक निर्णय असतो, त्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा किंवा त्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. सर्व आंदोलकांना एवढंच म्हणेन की जा आणि स्वतःसाठी काहीतरी काम शोधा. तुमच्या आयुष्यात काहीतरी उपयुक्त काम करा. याशिवाय मला त्यांना काहीच म्हणायचं नाही,” अशा शब्दांत शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी व झहीरला आंतरधर्मीय लग्नाबद्दल ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

Videos: सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी! रेखा, सायरा बानू, सलमान खानसह पोहोचले ‘हे’ स्टार्स

सोनाक्षी सिन्हा व झहीर यांना आंतरधर्मीय लग्नामुळे खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. परिणामी त्या दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो शेअर करताना त्यावरील कमेंट्स बंद केल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinha reacts on sonakshi sinha wedding trolling says my daughter has done nothing illegal or unconstitutional hrc