सध्या बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध जोड्या घटस्फोट घेत असताना, काही जोडप्यांनी मात्र एकमेकांबरोबरच्या दीर्घ सहवासाने यशस्वीपणे संसार केला आहे. या यशस्वी जोड्यांमध्ये अमिताभ बच्चन – जया बच्चन, शाहरुख खान – गौरी खान, अजय देवगण – काजोल यांच्या जोडीसह शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा यांचेही नाव आवर्जून घेतलं जातं. शत्रुघ्न आणि पूनम यांनी आपल्या संसारात आलेल्या अडचणींवर मात करून आपला संसार यशस्वी केला आहे. परंतु, एक वेळ अशी आली होती की, ज्यामुळे त्यांचा संसार मोडण्याची शक्यता निर्माण झाली होती, असं खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूडचे ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) त्यांच्या खामोश डायलॉगमुळे ओळखले जातात. पडद्यावर सर्वांना ‘खामोश’ म्हणत शांत करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांना एकदा त्यांची पत्नी पूनम सिन्हा (Poonam Sinha) यांनी ‘खामोश’ केल्याचा किस्सा शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितला होता.

हेही वाचा…Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी २०१६ मध्ये जयपूर साहित्य संमेलनात आपल्या जीवनातील काही खास गोष्टी उघड केल्या होत्या. या व्यासपीठावर त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांसह काही खासगी गोष्टी देखील मांडल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या एका जुन्या विवाहबाह्य नात्याबद्दल सांगितलं होतं, “हे माझ्या पुस्तकातही नमूद केलं आहे. माझ्या पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं. त्या दिवशी तिने माझ्याकडून मी पुन्हा असं करणार नाही हे वचन घेतलं.” असं त्यांनी स्पष्ट केलं.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या आयुष्यातील आणखी एक मजेशीर किस्सा म्हणजे त्यांची वेळेवर न येण्याची सवय. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी कबूल केलं की ते स्वतःच्या लग्नातही तीन तास उशिरा पोहोचले होते.

हेही वाचा…आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

शत्रुघ्न व पूनम सिन्हा यांची प्रेमकहाणी एका रेल्वे प्रवासात सुरू झाली. त्या प्रवासात दोघे समोरासमोर बसले होते. याच प्रवासात शत्रुघ्न आणि पूनम यांची चांगली ओळख झाली. पूनमच्या काकींना शत्रुघ्न आवडले, म्हणून त्यांनी त्यांना आपला मुंबईचा घराचा पत्ता दिला, आणि पूनम आणि शत्रुघ्न या दोघांची मैत्री सुरू झाली. १४ वर्षांच्या या मैत्रीनंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.

हेही वाचा…कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…

एका जुन्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी पूनम यांना आपल्या कुटुंबाचा ‘मुख्य आधार’ म्हटले आणि आपल्या चित्रपट व राजकीय कारकिर्दीचा समतोल राखण्याचे श्रेय त्यांना दिलं. “ती एक महान स्त्री आहे आणि आमच्या घराचा आधारस्तंभ आहे. तिच्यासाठी घर हेच सर्वकाही आहे,” असे ते म्हणाले. माझं बाहेरगावी शूटिंग असलं तरी पूनम मुलांना कधीच एकटे सोडत नसे, हेच तिच्या समर्पणाचे प्रतीक ठरले आहे. शत्रुघ्न आणि पूनम यांना सोनाक्षी सिन्हा, लव सिन्हा आणि कुश सिन्हा अशी तीन मुलं आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinha reveals he cheated on his wife poonam sinha extra marital affair psg