सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. या दोघांचं लग्न २३ जूनला नाही, असा खुलासा सोनाक्षीचे वडील व दिग्गज अभिनेते, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. सोनाक्षी व झहीरच्या लग्नाचे तपशील त्यांनीच दिले आहेत. सोनाक्षी व झहीरचं लग्न कधी आहे, ते जाणून घेऊयात.

गुरुवारी, शत्रुघ्न आपल्या पत्नीसह आपल्या मुलीच्या होणाऱ्या सासू- सासऱ्यांना भेटले. इतकंच नाही तर शत्रुघ्न यांनी होणार जावई झहीर इक्बालबरोबर फोटो काढले आणि त्याला मिठीही मारली. आता शत्रुघ्न यांनी मुलगी सोनाक्षीच्या लग्नाच्या रिसेप्शनची तारीख जाहीर केली आहे. ‘टाईम्स नाऊ’शी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी व झहीर इक्बाल यांच्या रिसेप्शनची तारीख सांगितली. तसेच या खास दिवशी ते आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Archana Puran Singh reveals how Rekha responded when she asked about the mystery man in her life
अर्चन पूरन सिंगने रेखा यांना त्यांच्या आयुष्यातील ‘त्या’ मिस्ट्री मॅनबद्दल विचारलेला प्रश्न, काय उत्तर मिळालेलं? वाचा

शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘रामायणा’ बंगल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई; सोनाक्षीच्या हातावर सजली झहीर इक्बालच्या नावाची मेहंदी

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “मी आधी तुमच्याशी बोललो तेव्हापासून आता बरंच काही बदललं आहे. खरं तर लग्नाचं घर म्हटलं की तासातासाला काहीतरी बदलत असतंच. मी तुम्हाला संपूर्ण घटनाक्रम सांगू शकत नाही कारण ही कौटुंबिक गोष्ट आहे. मी पहलाज निहलानी यांना तुमच्याशी बोलण्यास सांगितलं होतं. पण आता मला वाटलं की मी स्वतःच बोलणं जास्त योग्य राहील. होय, मी आणि माझी पत्नी २३ जूनला होणाऱ्या सेलिब्रेशनचा भाग आहोत. हे लग्न नाही. हे लग्नाचं रिसेप्शन आहे ज्यात आम्ही सर्वजण २३ जूनला संध्याकाळी उपस्थि राहणार आहोत.”

Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ जूनला सोनाक्षी व झहीरच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. त्यामुळे त्यांचं लग्न आज २२ जून रोजी होईल असे अंदाज वर्तवले जात आहेत. सोनाक्षीच्या एका मैत्रिणीनेही या आधी सांगितलं होतं की त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन २३ जूनला असेल आणि ते २२ जूनला किंवा २३ जूनला सकाळी लग्न करतील. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. पण रिसेप्शन रविवारी संध्याकाळी आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

बॉयफ्रेंडपेक्षा वयाने मोठी आहे सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री ३७ वर्षांची तर झहीर इक्बालचं वय…

सोनाक्षी व झहीरच्या लग्नाबद्दल त्यांचे कुटुंबीय खूप आनंदी दिसत आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करणारे हे दोघे आता लग्नबंधनात अडकणार आहेत. सोनाक्षीच्या लग्नानिमित्त शत्रुघ्न सिन्हा यांचा मुंबईतील ‘रामायणा’ बंगल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यांच्या घराचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Story img Loader