बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या एकुलत्या एक लेकीचं लग्न रविवारी (२३ जून रोजी) पार पडलं. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी नोंदणी पद्धतीने आंतरधर्मीय लग्न केलं. तिच्या लग्नात हजेरी लावली असली तरी शत्रुघ्न सिन्हा नाराज असल्याच्या चर्चा होत्या, अशातच त्यांनी सोशल मीडियावर लेकीच्या लग्नाचे अनसीन फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शत्रुघ्न सिन्हा यांनी एक्सवर दोन पोस्ट केल्या आहेत. “सर्वांच्या शुभेच्छांनी मी भारावून गेलो आहे. तुमच्या शुभेच्छा खूप मोलाच्या आहेत. माझ्याकडे आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत,” असं कॅप्शन देत त्यांनी काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. या पोस्टला त्यांनी सिन्हा परिवार असा हॅशटॅग दिला आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये शत्रुघ्न सिन्हा व त्यांच्या पत्नी पूनम तसेच सोनाक्षी व झहीर पूजा करताना दिसत आहेत. यात त्यांनी सोनाक्षीच्या एंट्रीचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. एका फोटोत लेक व जावयाबरोबर पोज देताना शत्रुघ्न सिन्हा व पूनम सिन्हा दिसत आहेत. “हा खास दिवस आमच्याबरोबर साजरा केल्याबद्दल आम्ही कृतज्ञनतेच्या भावनेने सर्वांचे आभार मानतो. माझी लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल त्यांच्या आयुष्यातील सुंदर नवीन प्रवास सुरू करत आहेत, त्यासाठी तुम्ही जे प्रेम व शुभेच्छा दिल्या त्यामुळे आमच्यासाठी हा लग्न सोहळा ‘वेडिंग ऑफ द सेंच्युरी’ ठरला आहे,” असं शत्रुघ्न सिन्हा यांनी लिहिलं.

नवविवाहित सोनाक्षी सिन्हा व तिचा पती झहीर इक्बाल यांचे शिक्षण किती? जाणून घ्या

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी रविवारी कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलं. या जोडप्याच्या लग्नातील फोटो व व्हिडीओंची सध्या खूप चर्चा आहे. एकीकडे या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, तर दुसरीकडे आंतरधर्मीय लग्न केल्याने सोनाक्षीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. सोनाक्षीने तिच्या लग्नाच्या फोटोंच्या पोस्टवरील कमेंट्सही बंद केल्या होत्या.

सोनाक्षी सिन्हाने लग्नात नेसली आईची साडी, तर रिसेप्शनच्या लाल बनारसी साडीची किंमत फक्त…

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी घरीच नोंदणी पद्धतीने लग्न केल्यावर मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन पार्टी ठेवली होती. या दोघांच्या रिसेप्शनला जवळपास अख्खं बॉलीवूड अवतरलं होतं. रेखा, सलमान खान, सायरा बानू, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, आदित्य कपूर, रिचा चड्ढा, संजीदा शेख, आकांक्षा रंजन, हुमा कुरेशी, अनिल कपूर, चंकी पांडे यांनी हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinha shared unseen videos of daughter sonakshi sinha zaheer iqbal wedding calls it wedding of the century hrc