सोनाक्षी सिन्हाने बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी रविवारी (२३ जून रोजी) मुंबईत लग्न केलं. झहीर व सोनाक्षीचे धर्म वेगवेगळे असल्याने त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आणि नंतर त्यांचा रिसेप्शन सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण या लग्नाला सोनाक्षीच्या जवळचे दोन लोक गैरहजर राहिले, ते म्हणजे तिचे भाऊ होय. सोनाक्षीचे जुळे भाऊ लव व कुश दोघेही लग्न आणि रिसेप्शनला आले नव्हते.
सोनाक्षी सिन्हा व झहीरच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या फोटो व व्हिडीओंमध्ये तिचे मोठे भाऊ लव व कुश दिसत नाहीत, त्यामुळे लग्नात नव्हते अशा चर्चा होत्या. “सोनाक्षीचे आई -वडील या लग्नाला उपस्थित होते आणि मुलीच्या लग्नाबद्दल आनंदी होते. मात्र, तिचे भाऊ लग्नाला तसेच रिसेप्शनला आले नाहीत. फोटोग्राफर्सना ते शेवटपर्यंत कार्यक्रमस्थळी जाताना दिसले नाहीत,” असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने एका सूत्राच्या हवाल्याने दिलं आहे.
सोनाक्षी सिन्हाने लग्नात नेसली आईची साडी, तर रिसेप्शनच्या लाल बनारसी साडीची किंमत फक्त…
हिंदुस्तान टाईम्सने याबाबत जाणून घेण्यासाठी लवशी संपर्क साधला. त्याने प्रश्न टाळला नाही आणि अफवा नाकारल्यादेखील नाही. “कृपया मला एक-दोन दिवस वेळ द्या. जर मला वाटलं की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन तर नक्कीच देईन. मला विचारल्याबद्दल धन्यवाद,” असं त्याने म्हटलं.
दरम्यान, यापूर्वीही लव याला सोनाक्षी व झहीरच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हाही त्याने बोलणं टाळलं होतं. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी व झहीर लग्न करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्यानंतर लव सिन्हाला त्याबाबत विचारण्यात आलं होतं. “मी सध्या मुंबईबाहेर आहे. बातम्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांबाबत बोलायचं झाल्यास मला त्यावर काहीच टिप्पणी करायची नाही. माझा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही,” असं लव ‘इ-टाइम्स’ शी बोलताना म्हणाला होता.
सोनाक्षीचा जवळचा मित्र आणि हुमा कुरेशीचा भाऊ अभिनेता साकिब सलीमने तिच्या लग्नात भावाची जबाबदारी पार पाडली. या लग्नाला सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम यांनी हजेरी लावली होती. सोनाक्षीच्या लग्नाच्या निर्णयाबद्दल सिन्हा कुटुंबात तणाव होता. कारण सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा यांनाही तिच्या लग्नाबद्दल माहीत नव्हतं. आजकालची मुलं आई-वडिलांची परवानगी घेत नाहीत, तर ते निर्णय कळवतात असं त्यांना सोनाक्षीबद्दल विचारल्यावर ते म्हणाले होते.