बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनाक्षी सिन्हा. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षीचा आज तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. २०१० साली तिने ‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नुकतंच सोनाक्षी सिन्हाला तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतंच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सोनाक्षीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोद्वारे त्यांनी लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी सलग चार ट्वीट करत सोनाक्षीला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “शेवटचा हॅशटॅग महत्त्वाचा…” ओंकार राऊतच्या ‘त्या’ पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरची कमेंट चर्चेत
“तू आमच्यासाठी नेहमीच खास असशील. फक्त हा दिवसच नाही तर येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात खूप आनंद आणि प्रेम घेऊन येवो, अशीच आमची इच्छा आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हाला तुझा फार गर्व आहे. तुझ्याकडे असलेल्या सर्वच गोष्टींचा आम्हाला खूप अभिमान आहे”, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.
आणखी वाचा : Video : लहानपणी ‘अशी’ दिसायची प्रियदर्शनी इंदलकर, १५ वर्षांपूर्वीचा कॉमेडी शोमधील ‘तो’ व्हिडीओ समोर
दरम्यान सोनाक्षी सिन्हा ही लवकरच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्याबरोबर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याबरोबरच ती आणखी एका चित्रपटाचे शूटींग करत आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही.