बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या विवाहामुळे मोठ्या चर्चेत आहे. तिने झहीर इक्बालबरोबर लग्नगाठ बांधली असून तिने लग्न करणार असल्याचे जाहीर केल्यापासून ती मोठ्या चर्चेत होती. आंतरधर्मीय लग्न करत असल्यामुळे तिच्यावर मोठी टीका करण्यात आली होती. याबरोबरच सोनाक्षी आणि संपूर्ण सिन्हा कुटुंबाविरुद्ध मोर्चेदेखील काढल्याचे पाहायला मिळाले होते.

काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

सोनाक्षी आणि झहीरने नुकतीच ‘गल्लाटा इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान या जोडप्याने शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये शत्रुघ्न सिन्हांनी आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, सोनाक्षी आणि झहीर हे एकमेकांसाठी बनलेले आहेत. लोकांनी काहीही म्हणण्याचा प्रयत्न केला, मात्र आमच्यासाठी आमच्या मुलांचा आनंद सर्वोच्च आहे. विशेष म्हणजे आमच्या मुलीचा आनंद आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला वाटतं की, ती आनंदी आहे आणि कायम आनंदी राहील. तिने काहीच असंवैधानिक किंवा कायद्याच्या विरुद्ध केलेले नाही. पालक आपल्या मुलांसाठी खूप काही करतात आणि मुलीसोबत खंबीरपणे उभे राहणे हा छोटा वाटा आहे. ती नेहमी म्हणते, माझे वडील माझ्या शक्तीचा आधारस्तंभ आहे. मी तिच्या अपेक्षा पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. तिच्या निर्णयांमध्ये आणि आनंदामध्ये मी कायमच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन, असे सोनाक्षीने दाखवलेल्या व्हिडीओ क्लीपमध्ये त्यांनी म्हटले आहे.

lokmanas
लोकमानस: राजकीय टीकेचा परीघ ओळखा…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Sharmila Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Sharmila Thackeray : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे…”
Badlapur, Vaman Mhatre, Shiv Sena, abuse allegations, Adarsh School, female journalist,
मला बदनाम करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी, शिवसेना बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे स्पष्टीकरण
PM Thailand, Paetongtarn Shinawatra,
विश्लेषण : थायलंडच्या पंतप्रधानपदी ३७ वर्षीय युवा महिला… कोण आहेत पेतोंगतार्न शिनावात्रा? त्यांच्यासमोर कोणती आव्हाने?
doctors protest in Kolkata against Rape and Murder Case
अग्रलेख : मुली, तू जन्मूच नकोस…
ti phulrani dramatization by P L deshpande
‘ती’च्या भोवती : आत्मसन्मानाचं स्फुल्लिंग!
When Jaya Bachchan said Aishwarya Rai is not my daughter
“ती माझी मुलगी नाही,” ऐश्वर्या रायबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर जया बच्चन यांनी केलेलं वक्तव्य; म्हणालेल्या, “मी तिच्याशी…”

हेही वाचा : तीन पिढ्यांनी सादर केलेल्या गाण्यात रसिक तल्लीन!

सोनाक्षी आणि झहीरने त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत २३ जूनला नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. त्यानंतर त्यांनी रिसेप्शन ठेवले होते. यावेळी बॉलीवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांचे कुटुंबीय या लग्नामुळे आनंदी नाहीत, अशा मोठ्या चर्चा होत्या. याबरोबरच, सोनाक्षीच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा आनंदाने सहभागी झालेले दिसले, मात्र तिचे भाऊ लग्नात दिसले नाहीत, त्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात होते. कुश सिन्हाने एक्स अकाउंटवर हा काळ कुटुंबासाठी संवेदनशील असल्याचे म्हटले होते. सोनाक्षीच्या लग्नात लव आणि कुशच्या गैरहजेरीवर शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीदरम्यान आपले मत मांडले होते. त्यांनी म्हटले होते की, कोणाच्या घरात मतभेद असत नाहीत. आमच्यात मतभेद असू शकतात, एखाद्या मुद्द्यावरून आमच्यात वाद होऊ शकतो; शेवटी आमचे कुटुंब एक असून कोणीही आम्हाला तोडू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते.